banner 728x90

राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेलांना ईडीची नोटीस, 18 तारखेला चौकशी

banner 468x60

Share This:
मुंबई – वरळीच्या सीजे हाऊस इमारतीच्या जमीन व्यवहार घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं नाव प्रकरणात ईडीच्या रडारवर होतं, जे आता जाहीर झालं आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल यांचंही नाव आता या जमीन व्यवहाराच्या घोटाळ्याप्रकरणात जोडलं गेलं आहे.
प्रफुल पटेलांनी संबंधित करार करताना कोणताही गैरव्यवहार केला नसल्याचं स्पष्ट केलं, ईडीची नोटीस जाहीर झाल्यानंतर पटेल यांची मुंबईत पत्रकार परिषद झाली. ही प्रॉपर्टी हजरा इकबाल मेमन यांची असल्याकारणाने याच्या व्यवहाराचा आमच्याशी संबंध नसल्याचं पटेल यांनी पत्रकारांना सांगितलं.
मेमन यांना 199 साली पासपोर्ट मिळाला आणि त्या युएईला जाऊनही आल्या, हा मुद्दा प्रफुल यांनी मांडला कारण गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्यास पासपोर्ट आणि प्रवासात अडचणी येतात. मेमन यांची पार्श्वभूमीसुद्धा व्यवहारापूर्वी आम्ही तपासली होती. त्यामुळे त्यांच्यासोबत व्यवहार केल्याने कायद्याचं उल्लंघन होणार नाही ही खात्री आम्ही अगोदरच घेतली होती त्यानंतर कागदावर सह्या केल्या, त्यामुळे आता कोणतंही प्रश्नचिन्ह उपस्थित होण्याचा प्रश्न नाही, असं प्रफुल पटेल म्हणाले.
ईडीतर्फे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या एकेकाळी जवळ असलेल्या इकबाल मिर्ची गँगच्या दोन गुंडांना 200 कोटींच्या जमीन व्यवहार प्रकरणात काल अटक करण्यात आली. हारून युसूफ आणि रंजित सिंग बिंद्रा अशी अटक आरोपींची नावं आहेत. ईडीने प्रफुल पटेल यांना ईडीने समन्स बजावलं आहे, चौकशीसाठी 18 ऑक्टोबरला त्यांना ईडी कार्यालयात हजेरी लावावी लागणार आहे. ईडीकडून या जमीन व्यवहाराची पडताळणी केली जात आहे. वरळीच्या सीजे हाऊस इमारतीसाठी मनी लॉंड्रिंग आणि याच्या खरेदीसाठी परदेशी खात्यांचा वापर केला गेला का याची तपासणी सध्या ईडीचे अधिकारी करत आहेत.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!