banner 728x90

डहाणूतील स्वस्त धान्य दुकानदार संघटनेची चौकशी तहसीलदारांचे आदेश

banner 468x60

Share This:

पालघर-योगेश चांदेकर

banner 325x300

एकाच दुकानदाराकडून चार ठिकाणी दुकाने चालवण्याबाबतही चौकशी होणार

लक्षवेधी’च्या वृत्ताची दखल

पालघरः डहाणू तालुक्यात स्वस्त धान्य दुकानातील धान्याला फुटत असलेले पाय आणि स्वस्त धान्य दुकानदार संघटनेकडून पुरवठा अधिकाऱ्यांच्या सरबराईसाठी वसूल केले जात असलेले पैसे? या बाबीची तहसीलदार सुनील कोळी यांनी दखल घेतली असून, चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, पुरवठा विभागाचा स्वस्त धान्य दुकानदारांच्या पैसे वसुलीशी काहीही संबंध नसल्याचे स्पष्टीकरण त्यांनी काढलेल्या पत्रात दिले आहे .

तहसीलदार कोळी यांनी याबाबत काढलेल्या आदेशात ‘लक्षवेधी’च्या वृत्ताचा आवर्जून उल्लेख केला असून तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदाराकडून दर महिन्याला सुमारे ऐंशी हजार रुपयांची वसुली कशी केली जात आहे, याबाबतचा पर्दाफाश लक्षवेधीने केला होता. स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या दोन पदाधिकारी यांनी अशा प्रकारे पैसे वसूल केले जात असल्याचे मान्य केले होते.

अनेक प्रश्न अनुत्तरित
प्रति शिधापत्रिका दरमहा दोन रुपये न दिल्यास वेगवेगळ्या चौकशीच्या नावाखाली संबंधितांची कशी छळवणूक केली जाते, याचा उल्लेख ‘लक्षवेधी’च्या वृत्तात होता. या वृत्ताची आता तहसीलदार कोळी यांनी दखल घेऊन त्याची चौकशी करण्यासंदर्भात आदेश काढले आहेत. स्वस्त धान्य दुकानदारांची संघटना स्वस्त धान्य दुकानदारांची कशी छ‍ळवणूक करते आणि पुरवठा विभागात कसे गैरप्रकार चालू आहेत, याबाबतचे लक्षवेधीने दिले होते, व त्याची वृत्तमालिका केली होती. त्यात अनेक पुरावे दिले होते.

प्रतिशिधापत्रिका दोन रुपये वसूल करीत असल्याचे मान्य
स्वस्त धान्य दुकानदाराकडून प्रति शिधापत्रिका दोन रुपये वसूल केले जातात. डहाणू तालुक्यात २०७ स्वस्त धान्य दुकाने असून त्यातील प्रत्येक शिधापत्रिकेमागे दोन रुपयांप्रमाणे वर्षाचे लाखो रुपये जमा होतात. एका दुकानात सरासरी ५०० ते एक हजार शिधापत्रिका आहेत. दरम्यान दोन स्वस्त धान्य दुकानदाराने आपण प्रतिशिधापत्रिका दोन रुपये वसूल करीत असल्याचे मान्य केले होते. दरम्यान या वसुली करिता संघटनेचे समंधीत पदाधिकारी यांनी तालुक्यात वेगवेगळे विभाग वाटून घेतले होते आता याबाबत ‘लक्षवेधी’च्या या वृत्ताचा उल्लेख करून तहसीलदारांनी संघटनेकडे या प्रकरणी स्पष्टीकरण मागितले आहे.

वसुलीशी पुरवठा विभागाचा काहीही संबंध नाही चौकशी आदेशात उल्लेख
रास्त भाव दुकानदार संघटना रास्त भाव धान्य दुकानदार यांच्याकडून वसूल करीत असलेल्या पैशाचे पुढे काय होते, ते कुठे जमा केले जातात, त्याचे काही खाते आहे का, याचा कोणताही हिशेब दिला जात नाही. एका स्वस्त धान्य दुकानदाराने तर पुरवठा निरीक्षक तसेच अन्य अधिकारी तपासणीसाठी आल्यास त्यांची कशी सरबराई करावी लागते, हे सांगितले होते? परंतु तहसीलदारांनी स्वस्त धान्य दुकानदार संघटना करीत असलेल्या वसुलीशी पुरवठा विभागाचा काहीही संबंध नाही, असे स्पष्ट पत्रात नमूद केले आहे. तसेच एकच व्यक्ती चार दुकाने सांभाळते. स्वस्त धान्य दुकानासाठी काही नियम आहेत. एकच व्यक्ती चार दुकाने सांभाळू शकत नाही. या व्यक्तीने अन्य तीन दुकानांवर कोणाची नियुक्ती केली आहे का, त्यासाठी पुरवठा विभागाचे मान्यता घेतली आहे का किंवा करारनामे केली आहेत का असे अनेक प्रश्न उपस्थित होत असून याबाबत ‘लक्षवेधी’ने प्रकाश टाकल्याने आता तहसीलदारांनी त्याची चौकशी सुरू केली आहे.

दुकानदार संघटना व कडू यांना नोटीस
याबाबत रास्त भाव दुकानदार संघटना आणि समंधीत रास्त भाव दुकानदार यांना तात्काळ खुलासा करण्यास सांगितले असून आता या प्रकरणी स्वस्त धान्य दुकानदार आणि स्वस्त धान्य दुकानदार संघटना हे काय खुलासे देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!