banner 728x90

मोठी बातमी! दिल्लीच्या लालकिल्ला परिसरात भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी

banner 468x60

Share This:

दिल्लीमध्ये लाल किल्ल्याच्या मेट्रो स्टेशनजवळ आज मोठा स्फोट झाला आहे, या स्फोटामुळे परिसरात एकाच गोंधळ उडाला, नागरिकांची धावपळ उडाली, स्फोटामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार या स्फोटामध्ये 8 जणांचा मृत्यू झाला आहे. या ठिकाणी पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या एका कारमध्ये हा स्फोट झाला आहे. या स्फोटाची तीव्रता एवढी जास्त होती की स्फोटानंतर या पार्किंगमध्ये असलेल्या सात ते आठ गाड्यांनी पेट घेतला, कार जळून खाक झाल्या आहेत. दरम्यान घटनेची माहिती मिळताच दिल्ली पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले असून, हा स्फोट नेमका कशामुळे झाला याचा तपास आता पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला असून, 24 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

आठ जणांचा मृत्यू

लाल किल्ल्याच्या मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या या स्फोटामध्ये आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. या स्फोटामध्ये ज्यांचा मृत्यू झाला आहे, ते नेमके कोण होते? त्याची माहिती अद्याप समोर आलेली नाहीये, मृतांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे, तर या स्फोटामध्ये अनेकज जण जखमी देखील झाले आहेत. जेव्हा स्फोट झाला तेव्हा ज्या कारमध्ये हा स्फोट झाला त्या कारच्या अगदी जवळ हे व्यक्ती उभे असावेत असा अंदाज आहे.

भीषण स्फोट

या स्फोटाची तीव्रता प्रचंड होती, ज्या कारमध्ये हा स्फोट झाला त्या कारचा फक्त सागांडा उरला आहे, तर या कारजवळ असलेल्या आणखी तीन कार स्फोटामध्ये जळून खाक झाल्या आहेत. तसेच इतरही सात ते आठ कारचं प्रचंड नुकसान झालं आहे. या स्फोटात आठ व्यक्तींचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत, दरम्यान या घटनेनंतर आता अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत, आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे. हा स्फोट नेमका कशामुळे झाला? याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.

banner 325x300

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!