banner 728x90

महत्त्वाची बातमी! 15 जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

banner 468x60

Share This:

Maharashtra Municipal Election 2026: बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) आणि इतर 29 महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. तो म्हणजे गुरुवार, 15 जानेवारी2026 रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.

मतदारांना आपला मतदानाचा हक्क विनाअडथळा बजावता यावा, यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

निवडणूक कार्यक्षेत्रातच सुट्टी लागू

राज्य सरकारने 2026 वर्षासाठी आधीच 24 सार्वजनिक सुट्ट्यांची यादी जाहीर केली होती. मात्र, त्यामध्ये 15 जानेवारीचा समावेश नव्हता. आता विशेष तरतूद म्हणून ही महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानासाठी सुट्टी घोषित करण्यात आली आहे. मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि ज्या 29 महापालिकांमध्ये निवडणुका होत आहेत, त्याच कार्यक्षेत्रासाठी ही सार्वजनिक सुट्टी लागू असेल, असे शासनाने जारी केलेल्या आदेशात म्हटलं आहे.

मतदानाची वेळ आणि निकालाचा दिवस

15 जानेवारी 2026 (गुरुवार) रोजी मुंबईसह राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी मतदान होणार आहे. सकाळी 7.30 ते संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत यावेळेत मतदान होणार आहे. तर मतमोजणी 16 जानेवारी 2026 रोजी होणार आहे.

बँका आणि शेअर बाजारावर काय परिणाम होणार?

या सुट्टीमुळे मुंबईतील शेअर बाजार (Stock Market) बंद राहण्याची शक्यता आहे. तथापि, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. आरबीआयच्या मुंबईसाठीच्या अधिकृत सुट्ट्यांच्या यादीत सध्या 15 जानेवारीचा समावेश नसल्याने बँकांच्या कामकाजाबाबत संभ्रम कायम आहे.

खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे काय?

खाजगी क्षेत्रातील कंपन्या आणि संस्थांना त्यांच्या कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्याबाबत स्वतः निर्णय घेण्याचा अधिकार देण्यात आला आहे. काही संस्था पूर्ण दिवसाची सुट्टी देण्याऐवजी मतदानासाठी सकाळी किंवा संध्याकाळी दोन तासांची सवलत देऊ शकतात.

आशियातील सर्वात मोठी स्वराज्य संस्था असलेल्या मुंबई महानगरपालिकेचे (BMC) 2025-26 या वर्षाचे बजेट 74,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. इतक्या मोठ्या आर्थिक ताकदीच्या संस्थेवर कोणाची सत्ता येणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाने सर्व मतदारांना आपला मतदानाचा पवित्र हक्क बजावण्याचे आवाहन केले आहे.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!