banner 728x90

Maharashtra Whether : राज्यात पुन्हा गारठा वाढला; उत्तर-मध्य महाराष्ट्रात थंडीचा कडाका

banner 468x60

Share This:

डिसेंबरअखेर ढगाळ वातावरणामुळे काही दिवस सौम्य वाटणारी थंडी आता पुन्हा जोर धरू लागली आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये आज सकाळपासूनच गार वारे आणि कमी तापमानामुळे थंडीची तीव्रता वाढल्याचे चित्र दिसत आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस तापमानात चढ-उतार असले तरी थंडी कायम राहण्याची शक्यता आहे.

ढग हटताच किमान तापमानात घट

गेल्या आठवडाभर ढगाळ हवामानामुळे थंडीचा प्रभाव काहीसा कमी झाला होता. मात्र ढग कमी होताच राज्यातील अनेक भागांत किमान तापमान पुन्हा घसरले आहे. उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रात सकाळी आणि रात्री गारठा वाढल्याचे जाणवत आहे.

उत्तर महाराष्ट्रात थंडीचा उच्चांक

आज निफाड येथील गहू संशोधन केंद्रात किमान तापमान 7 अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यात आले. मोहोळ येथे 7.1 अंश, तर धुळे येथे 7.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. जेऊर येथे किमान तापमान 9.5 अंश सेल्सिअस इतके होते. या घसरणीमुळे पहाटेच्या वेळी नागरिकांना चांगलाच गारठा अनुभवायला मिळाला.

विदर्भात किमान तापमानात सौम्य वाढ

राज्याच्या इतर भागांपेक्षा वेगळे चित्र विदर्भात पाहायला मिळाले. कालच्या तुलनेत आज विदर्भातील काही भागांत किमान तापमानात थोडी वाढ नोंदवण्यात आली. गोंदिया येथे किमान तापमान 10 अंश सेल्सिअस इतके होते, तर इतर ठिकाणी तापमान 10 अंशांच्या पुढे राहिले.

पुढील दिवसांत तापमानात चढ-उतार

हवामान विभागाच्या माहितीनुसार, राज्यातील तापमानात येत्या काही दिवसांत चढ-उतार सुरू राहतील. मात्र एकूणच थंडीचा प्रभाव कायम राहणार असून, पहाटे आणि रात्री गारठा जाणवण्याची शक्यता आहे.

मुंबईकरांसाठी स्थानिक हवामान अंदाज

मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये पुढील 24 तासांत आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कमाल तापमान सुमारे 31 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान सुमारे 18 अंश सेल्सिअस राहील. त्यामुळे मुंबईत थंडी सौम्य स्वरूपात जाणवणार आहे.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!