पालघर आगारात प्रवाशांच्या सेवेत पाच नवीन ‘राजमाता जिजाऊ’ बसगाड्यांचा समावेश करण्यात आला असून, सोमवार, १० ऑगस्ट २०२६ रोजी पालघरचे आमदार राजेंद्र गावित यांच्या हस्ते या नवीन बसगाड्यांचे अनावरण करण्यात आले. त्यामुळे पालघर परिसरातील प्रवाशांना अधिक चांगली आणि आरामदायी बससेवा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
या कार्यक्रमाला पालघर नगराध्यक्ष उत्तम घरत, रोहित गावित, नगरसेवक जस्विन घरत,विभागीय वाहतूक अधिकारी रोहिणी ठाकरे, अमीन तडवी, सोळंकी, कार्यशाळा अधीक्षक माणिक गायकवाड, राजू पाटील, संघटना विभागीय सचिव अर्शद चुनेवाला, नकुल पाटील यांच्यासह एसटी महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी आणि पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी आमदार राजेंद्र गावित यांनी पालघर बसस्थानकाच्या विकासाबाबत महत्त्वाची माहिती दिली. पालघर बसस्थानक हे बारामतीच्या धर्तीवर आधुनिक आणि सर्व सोयी-सुविधांनी सुसज्ज करण्यात यावे, अशी आपली इच्छा असून, त्यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता बसस्थानकात आवश्यक पायाभूत सुविधा, प्रवाशांसाठी सुविधा आणि वाहतूक व्यवस्थेत सुधारणा होणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने पालघर बसस्थानकाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे आमदार गावित यांनी स्पष्ट केले.
नवीन पाच ‘राजमाता जिजाऊ’ बसगाड्या पालघर आगारात दाखल झाल्याने ग्रामीण तसेच शहरी भागातील प्रवाशांना अधिक सक्षम सार्वजनिक वाहतूक सेवा मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. नवीन बससेवेमुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित, आरामदायी आणि सुलभ होण्यास मदत होणार आहे.
पालघर बसस्थानकाचा प्रस्तावित विकास आणि नवीन बसगाड्यांची सेवा यामुळे पालघरच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला नव्या दिशेने चालना मिळण्याची शक्यता आहे.
Home
पालघर
आमदार राजेंद्र गावित यांच्या हस्ते अनावरण; पालघर बसस्थानक बारामतीच्या धर्तीवर सुसज्ज करण्याचा प्रस्ताव
आमदार राजेंद्र गावित यांच्या हस्ते अनावरण; पालघर बसस्थानक बारामतीच्या धर्तीवर सुसज्ज करण्याचा प्रस्ताव
Recommendation for You

Post Views : 498 पालघर-योगेश चांदेकरआंदोलकांपुढे ‘महावितरण’चे लोटांगणजुन्या मीटरच्या बिलांबाबतही तक्रारी पालघर: स्मार्ट मीटर बसवण्याच्या…

Post Views : 498 पालघर-योगेश चांदेकर पालघर जिल्ह्याचा विकास हा केवळ शहरांच्या विकासापुरता मर्यादित ठेवून…















zzlWzi8qqy8Un4Ec/s320/1001506655.jpg