banner 728x90

एस.टी. बस चालकाची प्रवाशांची उघड फसवणूक…

banner 468x60

Share This:

जव्हार संदीप साळवे

जव्हार जव्हार आगाराच्या एस.टी. बस चालकाने केलेल्या उद्धट, असभ्य व बेजबाबदार वर्तनामुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची प्रतिमा धुळीस मिळाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पालघर–जव्हार–नाशिक मार्गावरील एस.टी. बस क्रमांक 1866 चा चालक रोशन बारगळ याने आरती तामोरे, शुभांगी अंभिरे, कल्पना पाटील, सुरेखा पाटील, किशोर जाधव अशा सुमारे 14
थेट जव्हारला जाणाऱ्या प्रवाशांची फसवणूक करत जव्हार आगाराचे आर्थिक नुकसान करत, “प्रवाशांची सेवा” या एस.टी.च्या ब्रीदवाक्यालाच हरताळ फासला आहे.
शनिवार, सायंकाळी सुमारे ५ वाजता पालघर आगारात डिझेल भरण्यासाठी उभ्या असलेल्या बसबाबत विचारणा केली असता चालकाने अत्यंत उद्धट आणि असभ्य भाषेत चुकीची माहिती दिली. “बस ५.३० वाजता जाईल” असे सांगून प्रत्यक्षात बस ५ वाजताच रवाना करण्यात आली. परिणामी थेट जव्हारला जाणारे अनेक प्रवासी जाणूनबुजून मागे पडले.की, ज्यामुळे जव्हार आगाराची नुकसान झाले. हा प्रकार केवळ निष्काळजीपणाचा नसून सरळसरळ प्रवाशांची फसवणूक असल्याचा आरोप होत आहे.
विशेष म्हणजे चालकाच्या बोलण्यात व हालचालीतून तो मद्यप्राशनाच्या अवस्थेत असल्याचा संशयही उपस्थित प्रवाशांनी व्यक्त केला आहे. सरकारी बस ही चालकाची खाजगी मालमत्ता असल्याप्रमाणे वागणूक देणे, प्रवाशांशी उर्मटपणे बोलणे आणि खोटी माहिती देणे हे अत्यंत गंभीर व निंदनीय आहे.
या प्रकारामुळे संतप्त प्रवाशांनी संबंधित चालकावर तात्काळ शिस्तभंगाची कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. अन्यथा जव्हार आगारावर लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. एस.टी. प्रशासन आता तरी डोळे उघडणार का? असा सवाल प्रवासी उपस्थित करत आहेत.
याबाबत जव्हार आगाराचे व्यवस्थापक बाळासाहेब झरीकर यांच्याशी मोबाइलद्वारे संपर्क केल्या असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!