banner 728x90

CBSE Board Exam: दहावीच्या परीक्षा वर्षातून दोनदा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय, काय आहे नवा नियम

banner 468x60

Share This:

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाची (सीबीएसई) बोर्डाची दहावी व बारावीच्या परीक्षा आजपासून सुरू होत आहे. यामध्ये ४६ लाखांहून अधिक विद्यार्थी बसले आहेत.

दहावीच्या बोर्ड परीक्षेच्या धोरणाबाबत केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) एक अत्यंत महत्त्वाचा सूचना दिली आहे.

नवीन धोरणानुसार, आता दहावीच्या प्रत्येक विद्यार्थ्याला पहिली बोर्ड परीक्षा देणे बंधनकारक करण्यात आले आहे. जे विद्यार्थी पहिल्या बोर्ड परीक्षेत किमान 3 विषयांमध्ये बसणार नाहीत, त्यांना थेट “अनिवार्य पुनरावृत्ती” (Essential Repeat) श्रेणीत टाकले जाईल, असे बोर्डाने केलेल्या नवीन नियमात स्पष्ट केले आहे.

पहिल्या परीक्षेला बसणे अनिवार्य करण्यात आले आहे. पहिली बोर्ड परीक्षा न देता थेट दुसऱ्या परीक्षेला बसता येणार नाही, अशा स्पष्ट सूचना सीबीएसईने दिल्या आहेत. नव्या नियमानुसार दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी पहिल्या बोर्ड परीक्षेस बसणे अत्यावश्यक आहे. जे विद्यार्थी पहिल्या परीक्षेत किमान तीन विषय देणार नाहीत, त्यांना अनिवार्य पुनर्परीक्षा श्रेणीत ठेवले जाईल, असे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) म्हटले आहे.

दहावीची दुसरी बोर्ड परीक्षा 15 मे ते 1 जून दरम्यान घेण्यात येणार असल्याचे बोर्डाने सांगितले आहे. बोर्डाने याच वर्षापासून 10वीच्या परीक्षा वर्षातून 2 वेळा घेण्याचा निर्णय घेतला आहे.

दुसरी परीक्षा कोणत्या विद्यार्थ्यांसाठी

-तीन मुख्य विषयांत सुधारणा करायची असल्यास

-कंपार्टमेंट आले असल्यास; कंपार्टमेंट व सुधारणा दोन्ही करायचे असल्यास

-पास असूनही दुसऱ्या विषयात सुधारणा करायची असल्यास

तीन विषयांत सुधारण्याची संधी

जे विद्यार्थी पहिल्या परीक्षेत पास झाले आहेत, त्यांना विज्ञान, गणित, सामाजिक शास्त्र, भाषा यापैकी कोणत्याही तीन मुख्य विषयांत गुण सुधारण्यासाठी दुसरी परीक्षा देता येईल.

गैरहजर विद्यार्थ्यांचे नियम

जर एखादा विद्यार्थी पहिल्या परीक्षेत तीन किंवा अधिक विषयांत अनुपस्थित असेल, तर त्याला दुसऱ्या परीक्षेला बसता येणार नाही. अशा विद्यार्थ्यांना अनिवार्य पुनर्परीक्षा श्रेणीत ठेवले जाईल. पुढील वर्षी फेब्रुवारीतील मुख्य परीक्षा द्यावी लागेल.

यासंदर्भातील अधिकृत माहिती cbse.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

banner 325x300

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!