वैद्यकीय कारणास्तव अनुपस्थित विद्यार्थ्यांसाठी संधी’कॉपीमुक्त अभियान’ची कडक अंमलबजावणी
तणावमुक्त परीक्षा अन् समुपदेशन सुविधा
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च मधील माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र दहावी ( SSC) परीक्षा ( Career) शुक्रवार, दि २० फेब्रुवारी २०२६ ते बुधवार, दि. १८ मार्च २०२६ या कालावधीत राज्यभर आयोजित करण्यात आली आहे. अशी माहिती पत्रकार परिषदेत राज्य मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार बेडसे यांनी दिली.
यंदा राज्यातील एकूण १६ लाख १५ हजार ४८९ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली असून त्यामध्ये ८ लाख ६५ हजार ७४० मुले, ७ लाख ४९ हजार ७३६ मुली आणि १३ ट्रान्सजेंडर विद्यार्थी आहेत. राज्यातील २३ हजार ६८३ शाळांमधून विद्यार्थ्यांची नोंदणी झाली असून संपूर्ण राज्यात ५ हजार १११ मुख्य परीक्षा केंद्रांवर परीक्षा पार पडणार आहे.
‘कॉपीमुक्त अभियान’ची कडक अंमलबजावणी
राज्यात परीक्षा पारदर्शक आणि निकोप वातावरणात व्हावी यासाठी कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. संपूर्ण राज्यात २७१ भरारी पथके नेमण्यात आली आहेत. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय दक्षता समित्या कार्यरत. परीक्षा केंद्रांच्या ५०० मीटर परिसरातील झेरॉक्स सेंटर बंद ठेवण्याच्या सूचना. सीसीटीव्ही असलेल्या केंद्रांवर परीक्षा कॅमेराबद्ध घेतली जाणार. गैरप्रकार करणाऱ्यांवर महाराष्ट्र गैरव्यवहार प्रतिबंधक कायदा, १९८२ अंतर्गत दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा दाखल होणार.
तणावमुक्त परीक्षा अन् समुपदेशन सुविधा
परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होणारा मानसिक ताण कमी करण्यासाठी राज्यस्तरावर १० समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक विभागीय मंडळ स्तरावर जिल्हानिहाय दोन समुपदेशक उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
समुपदेशकांचे संपर्क क्रमांक -९९६०६४४४११, ७९७२५७३७४२, ९८३४०८४५९३, ९३५९९७८३१५, ८१६९२०२२१४,९३७१६६१२५५, ७२०८४२९३८१, ७७०९१५६०६८, ८४२११५०५२८, ९४०४७८३९९६.
वैद्यकीय कारणास्तव अनुपस्थित विद्यार्थ्यांसाठी संधी
वैद्यकीय किंवा अपरिहार्य कारणास्तव प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षा किंवा अंतर्गत मूल्यमापन देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी लेखी परीक्षेनंतर २०, २३ व २४ मार्च २०२६ रोजी Out of Turn परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे. प्रात्यक्षिक व अंतर्गत मूल्यमापनाचे गुण ऑनलाईन पद्धतीने भरले जाणार आहेत.
आत्मविश्वासाने परीक्षा द्या; गैरप्रकार केल्यास कठोर कारवाई! जितेंद्र पापळकर यांचा इशारा
विद्यार्थांना परिक्षा केंद्रावरील सूचना
-विद्यार्थ्यांनी अर्धा तास आधी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे
-सकाळी १०.३० वाजता आणि दुपारी २.३० वाजता
-ऑनलाईन प्रवेश पत्र शाळांच्या लॉगिनमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
-उत्तरपत्रिका आणि प्रवेशपत्रावरील सूचनांचे पालन करण्याचे आवाहन.
-गतवर्षीप्रमाणेच निर्धारित वेळेनंतर १० मिनिटे अतिरिक्त वेळ देण्यात येणार आहे.
-दिव्यांग विद्यार्थ्यांना शासन निर्णयानुसार सवलती लागू राहतील.
Home
महाराष्ट्र
SSC Exam 2026: विद्यार्थ्यांची 'परीक्षा' सुरू; 'कॉपीमुक्त अभियान' अन् वैद्यकीय कारणास्तव अनुपस्थित.
SSC Exam 2026: विद्यार्थ्यांची ‘परीक्षा’ सुरू; ‘कॉपीमुक्त अभियान’ अन् वैद्यकीय कारणास्तव अनुपस्थित.
Recommendation for You

शिरगाव मांगेलआळी परिवाराचा समाजोपयोगी उपक्रम; गणेश विसर्जनासाठी विनामूल्य होडीसेवा व मनुष्यबळ उपलब्ध
Post Views : 165 पालघर : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी जपत शिरगाव मांगेलआळी परिवारातर्फे गणेशमूर्ती…

Post Views : 165 पालघर-योगेश चांदेकर आसनगावच्या सूर्यवंशी क्षत्रिय कुणबी समाज गणेशोत्सव मंडळाचा देखावा पालघर:…

Post Views : 165 महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात…

Post Views : 165 ऑनलाईन पेमेंट करण्यावर चार्जेस लागणार असल्याचं समोर आल्यानंतर सरकारवरील नाराजी वाढली….













zzlWzi8qqy8Un4Ec/s320/1001506655.jpg