banner 728x90

अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर

banner 468x60

Share This:

राज्यात मे महिन्यात इयत्ता दुसरी ते चौथीच्या शिक्षकांचे नवीन अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना आणि मतदारयादी पडताळणीची कामे एकाच वेळी आल्याने राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर तिहेरी जबाबदारीचा ताण वाढला असून नियोजनाबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने ( एस सी ई आर टी) इयत्ता २ री ते ४ थी साठी नवीन अभ्यासक्रम प्रशिक्षण जिल्हास्तरावर ११ ते १४ मे आणि तालुकास्तरावर १८ ते ३० मे दरम्यान आयोजित केले आहे. अभ्यासक्रम अंमलबजावणीसाठी हे प्रशिक्षण महत्त्वाचे मानले जात आहे.

जनगणनेचे आदेश मिळाले आहेत. एकाच वेळी (एससीईआरटी) चे इयत्ता २ री ते ४ थी प्रशिक्षण आणि जनगणना अशी दुहेरी कोंडी शिक्षकांसमोर उभी आहे.
विजय कोंबे, कार्याध्यक्ष, शिक्षक समिती

जनगणना हे राष्ट्रीय कर्तव्य आहे. नवीन अभ्यासक्रम प्रशिक्षणाचेही निर्देश आहेत. या दोन्ही गोष्टी लक्षात घेऊन योग्य तो मार्ग काढला जाईल. नंदकुमार बेडसे, प्रभारी संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद

तिहेरी जबाबदाऱ्यांमुळे चिंता

१६ मे ते १४ जूनदरम्यान जनगणनेचा पहिला टप्पा होणार असून बहुसंख्य शिक्षकांची प्रगणक व पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. त्याआधी जनगणना प्रशिक्षणही प्रस्तावित आहे. सध्या सुरू असलेल्या मतदार यादी पडताळणी मोहिमेमुळे अनेक शिक्षक बीएलओ म्हणून कार्यरत आहेत. त्यामुळे एकाच वेळी तीन महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडताना अडचणी निर्माण झाल्याचे शिक्षकांनी सांगितले.एसआयआरचे काम न करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यापर्यंत वेळ आली आहे. तसेच आता एससीईआरटीच्या प्रशिक्षणाला हजर रहावे की जनगणनेच्या कामाला, अशी चिंता शिक्षकांना भेडसावत आहे.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!