मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील घोडबंदर जवळच्या रस्त्यावर पालघरचे खासदार डॉ. हेमंत विष्णू सवरा यांच्या गाडीचा अपघात झाला आहे. खासदार यांची गाडी विरुद्ध दिशेने जात असताना समोरून येणाऱ्या हायवा ट्रकची धडक बसल्याने हा अपघात घडला.
ही घटना शुक्रवारी सकाळच्या सुमारास घडली असून खासदार सवरा व त्यांच्यासोबत असलेले सहकारी हे सुखरूप आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार नुसार खासदार डॉ. हेमंत सवरा हे मुंबईहून पालघर कडे जाण्यास रवाना झाले होते. मात्र गुजरात वाहिनीवर वाहतूक कोंडी असल्याने त्यांनी आपली गाडी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरून काढली याच दरम्यान समोरून येणाऱ्या हायवा ट्रकची त्याच्या गाडीला जोराची धडक बसून अपघात घडला आहे.
सुदैवाने या घटनेतून खासदार सवरा हे सुखरूप बचावले आहेत. यात त्यांच्या वाहनचालकाला किरकोळ दुखापत झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातानंतर गाडीतील एअर बॅग उघडल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. या घटनेची माहिती मिळताच नायगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

















zzlWzi8qqy8Un4Ec/s320/1001506655.jpg