Breaking News
दहावीचा निकाल जाहीर; राज्याचा निकाल ९२.०९ टक्के, यंदाही मुलींनीच मारली बाजी! पालघर अत्याचार प्रकरण : पीडित मुलीला न्याय मिळेपर्यंत सातत्याने पाठपुरावा; आरोपीला जामीन नको, कठोर कारवाई – विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे ऑपरेशन टायगर आधीच उद्धव ठाकरे गटासाठी वाईट बातमी, आमदार-खासदाराचं भांडण चव्हाट्यावर, राजकीय भूकंपाचे स्पष्ट संकेत लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपींना पॅरोल बंद करण्याच्या हालचाली; मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांचे निर्देश “युवासेनेच्या लोकसभाध्यक्षदी चेतन धानेमेहेर यांची नियुक्ती” युवासेनेच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांचा विश्वास सार्थ ठरवणार पदनियुक्ती ही मोठी जबाबदारी असल्याची जाणीव
banner 728x90

दहावीचा निकाल जाहीर; राज्याचा निकाल ९२.०९ टक्के, यंदाही मुलींनीच मारली बाजी!

banner 468x60

Share This:

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. यंदाच्या वर्षी देखील मुलींनीच बाजी मारली आहे. राज्याचा एकूण निकाल ९२.०९ टक्के लागला असून मुलांच्या तुलनेत मुलींचा निकाल ५.४० टक्क्यांनी अधिक आहे.

राज्यातून एकूण १६ लाख १६४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती, त्यापैकी १४ लाख ५२ हजार २४६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९४.९६ टक्के आहे, तर मुलांचे प्रमाण ८९.५६ टक्के इतके आहे. विभागांनुसार विचार केला असता, कोकण विभाग ९७.६२ टक्क्यांसह अव्वल ठरला आहे, तर छत्रपती संभाजीनगर विभागाचा निकाल सर्वात कमी (८८.४१ टक्के) लागला आहे.

राज्यातील ६ हजार ६१२ शाळांचा निकाल १०० टक्के लागला असून, ४ लाख २२ हजार ८९१ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणीसह प्राविण्य मिळवले आहे.

banner 325x300

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!