महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. यंदाच्या वर्षी देखील मुलींनीच बाजी मारली आहे. राज्याचा एकूण निकाल ९२.०९ टक्के लागला असून मुलांच्या तुलनेत मुलींचा निकाल ५.४० टक्क्यांनी अधिक आहे.
राज्यातून एकूण १६ लाख १६४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती, त्यापैकी १४ लाख ५२ हजार २४६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९४.९६ टक्के आहे, तर मुलांचे प्रमाण ८९.५६ टक्के इतके आहे. विभागांनुसार विचार केला असता, कोकण विभाग ९७.६२ टक्क्यांसह अव्वल ठरला आहे, तर छत्रपती संभाजीनगर विभागाचा निकाल सर्वात कमी (८८.४१ टक्के) लागला आहे.
राज्यातील ६ हजार ६१२ शाळांचा निकाल १०० टक्के लागला असून, ४ लाख २२ हजार ८९१ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणीसह प्राविण्य मिळवले आहे.
















zzlWzi8qqy8Un4Ec/s320/1001506655.jpg