banner 728x90

राजकारणात भूकंप! सुनील तटकरे शरद पवारांच्या भेटीला, गुवाहटीवरून थेट सिल्व्हर ओकवर!

banner 468x60

Share This:

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्याक्ष सुनील तटकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांच्या भेटीला सिल्व्हर ओक या निवासस्थानी पोहचले आहे. राजकरणातील ही सर्वात मोठी घडामोड असून सुनील तटकरेंच पक्षांतील महत्त्व कमी झाल्याच्या चर्चानंतर आज सुनील तटकरे भेटीला गेल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

राष्ट्रवादी अजित पवार गटातील नाराजी नाट्यानंतर तटकरे शरद पवारांच्या भेटीला गेल्याने चर्चांना उधाण आले आहे. अद्याप या भेटीचे कारण समोर आले नाही. मात्र बऱ्याच सुनिल तटकरे हे बरेच दिवस शरद पवार यांची भेटीची वेळ मागत होते. आज ती भेटीची वेळ मिळाल्यानंतर सुनिल तटकरे सिल्व्हर ओकवर पोहचल्याची प्राथमिक आहे.
गुवाहटीवरून परतताच भेटीला

राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीतून ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल आणि खासदार सुनील तटकरे यांना वगळल्याने महाराष्ट्रासह देशभरात चर्चा होत आहे. पटेल तटकरे यांना पदच्युत केल्याचेही वृत्त राजकीय वर्तुळात आहे. असे असताना तटकरे यांनी शरद पवार यांच्या भेटीला जाणे, याचे अधिक महत्त्व आहे. शरद पवार आणि सुनील तटकरे यांच्या भेटीचे कारण जरी अस्पष्ट असले तरी ही भेट निश्चित राजकीय मुद्द्यावरच आहे, असे राजकीय जाणकार सांगतात. सध्याच्या राजकीय घडामोडींच्या अनुषंगानेच ही भेट झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी पवारसाहेबांची भेट

पवारसाहेबांची तब्येत बरी नव्हती. ते ब्रीच कँडमध्ये अॅडमिट होते. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी मी सिल्व्हर ओकवर आलो होतो. यामध्ये कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, असे सुनील तटकरे यांनी शरद पवार यांच्या भेटीनंतर माध्यमांना सांगितले. आसामचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या शपथविधीकरिता आसामला गेलो होतो. गुवाहाटीवरून परत येताना शरद पवार यांच्या भेटीची वेळ मिळाल्याचे कळाले. त्यामुळे थेट सिल्व्हर ओकवर आलो आणि साहेबांची भेट घेतली, असे तटकरे म्हणाले.
तटकरे बऱ्याच दिवसांपासून भेटीच्या प्रतिक्षेत, आज भेटीची वेळ मिळाली


सुनील तटकरे हे बऱ्याच दिवसांपासून शरद पवार यांच्याकडे भेटीची वेळ मागत होते. मात्र शरद पवार यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना भेटीची वेळ मिळत नव्हती. अखेर आज शरद पवार यांनी त्यांना भेटीची वेळ दिल्याने उभय नेत्यांमध्ये काही वेळ चर्चा झाली.

banner 325x300

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!