पावसाळ्यात नाले आणि जलवाहिन्या यांमध्ये अडथळे निर्माण होऊन पाणी तुंबण्यामागे प्लास्टिक हे प्रमुख कारण आहे. मुंबई महापालिका येत्या काही दिवसांत प्लास्टिकच्या विरोधात बाजारपेठांमध्ये विशेष मोहीम राबवणार आहे.
प्रतिबंधित ५० मायक्रॉनपेक्षा न्यून जाडीच्या प्लास्टिक पिशव्या वापरणारे व्यापारी, दुकानदार यांच्यावर मुंबई महापालिकेकडून सातत्याने कारवाई होत असली, तरी मुंबईतील प्लास्टिकचा वापर आणि विक्री काही केल्या आटोक्यात येत नाही.
मुंबईतील मलबार हिल, गिरगाव, ग्रँट रोड, परळ, चेंबूर, भांडुप (पश्चिम), मुलुंड, कुर्ला, सांताक्रूझ पूर्व, दहिसर या भागांत प्लास्टिकचा वापर अधिक प्रमाणात आढळून आला आहे. त्यामुळे तेथे विशेष कारवाया केल्या जात आहेत. जून २०१८ ते मार्च २०२६ या कालावधीत महापालिकेने तब्बल १ लाख १९ सहस्र ४३७ किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त केले आहे. १८ सहस्र ४०८ प्रकरणांत ९ कोटी २१ लाख ५० सहस्र रुपयांचा दंड वसूल केला आहे.

















zzlWzi8qqy8Un4Ec/s320/1001506655.jpg