banner 728x90

सरकारचा मोठा निर्णय! CM फडणवीस यांच्यासह सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या अर्ध्यावर

banner 468x60

Share This:

इंधन आणि परकीय चलन बचतीच्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज 2 उच्चस्तरीय बैठकीत विविध उपाययोजनांचा आढावा घेतला.

यावेळी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी त्यांनी काही निर्णय जाहीर केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचतीचं आवाहन केल्यानंतर राज्य सरकारनेही खर्च नियंत्रण आणि इंधन बचतीसाठी पावले उचलली आहेत.

बैठकीत घेण्यात आलेले प्रमुख निर्णय :-

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या ही तात्काळ प्रभावाने अर्ध्यावर आणण्यात यावी. बाहेरच्या प्रवासात असताना ताफ्यातील वाहनांची संख्या निर्धारित संख्येपेक्षा अधिक नसेल याची जबाबदारी संबंधित पोलीस आयुक्त किंवा पोलीस अधीक्षक यांची असेल.
मंत्री-अधिकारी यांनी कोणतेही विदेश दौरे करु नयेत.
मंत्र्यांनी अत्यावश्यक नसेल तेव्हा शासकीय विमान, हेलिकॉप्टर यांचा वापर करु नये, त्याऐवजी नियमित विमानसेवेचा वापर करावा.
मंत्री-अधिकाऱ्यांनी आवर्जून मेट्रो आदी सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढवावा. पहिल्या टप्प्यात किमान एक दिवस असा प्रयोग करावा.
अधिकाऱ्यांना बैठकांना बोलावण्याऐवजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठका घ्याव्यात.
शासनात वितरित करण्यात आलेल्या वाहनांचा काटेकोरपणे आढावा घेण्यात यावा.
ऊर्जा बचतीसाठी अनावश्यक होर्डिंग्ज/फ्लेक्सवरील कारवाया वाढवण्यात याव्यात आणि तेथे डेकोरेटिव्ह लायटिंगचा वापर होणार नाही, याची काळजी घेण्यात यावी.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!