पालघर : देशभरातील मुस्लिम समाजाकडून विविध ठिकाणी गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करण्याची मागणी करण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता पालघर जिल्ह्यातूनही या मागणीला सुरुवात झाली असून, पालघर जिल्ह्यातील मुस्लिम समाजाने गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करण्याच्या मागणीसाठी प्रशासनाला निवेदन सादर केले आहे.
हे निवेदन पालघर जिल्हा प्रशासनामार्फत महाराष्ट्र शासन आणि भारत सरकारपर्यंत पोहोचवण्याची विनंती करण्यात आली आहे. मुस्लिम समाजाच्या या उपक्रमाला हिंदू-मुस्लिम ऐक्य, सामाजिक सलोखा आणि परस्पर बंधुभाव अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण संदेश मानले जात आहे.
समाजाच्या प्रतिनिधींनी नागरिकांना आवाहन केले की, कुर्बानीच्या वेळी गायीची कुर्बानी देऊ नये, कारण देशातील हिंदू समाज गायीला श्रद्धा आणि पूजनीय भावनेने पाहतो. परस्पर सन्मान आणि सामाजिक सलोखा जपणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.
निवेदनात म्हटले आहे की, भारतीय संस्कृती, परंपरा आणि समाजात गायीला विशेष महत्त्व असून देशभरातील कोट्यवधी लोक तिच्याकडे श्रद्धा आणि सन्मानाने पाहतात. याच भावनेतून गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करण्याची मागणी करण्यात आली आहे.
यावेळी दारुल उलूम गौसिया ट्रस्टचे मुख्य विश्वस्त रफीक शेख, अजमत शाह उर्फ मिंटू यांच्यासह मुस्लिम समाजातील नागरिकांनी पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांना निवेदन देत गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करण्याची मागणी केली.
कार्यक्रमाला सामाजिक आणि धार्मिक संस्थांचे सदस्य देखील उपस्थित होते. प्रशासनाने निवेदन स्वीकारून ही मागणी योग्य स्तरावर पाठवण्याचे आश्वासन दिले.बहुजन विकास अघाड़ीचे
अजमत शाह उर्फ मिंटू यांनी सांगितले की, हा उपक्रम सामाजिक सलोखा, बंधुभाव आणि राष्ट्रीय एकात्मता मजबूत करण्याच्या उद्देशाने करण्यात आला आहे.
Home
पालघर
पालघरच्या मुस्लिम समाजाकडून गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करण्याची मागणी, सामाजिक सलोखा आणि बंधुभावाचा संदेश
पालघरच्या मुस्लिम समाजाकडून गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करण्याची मागणी, सामाजिक सलोखा आणि बंधुभावाचा संदेश
Recommendation for You

Post Views : 316 पालघर– मोखाडा तालुक्यातील घाणवळ परिसरातील दोन महिन्यांच्या बालकाचा लसीकरणानंतर मृत्यू झाल्याची…

Post Views : 316 पालघर– आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यातील वीजपुरवठा सुरळीत व अखंडित राहावा,…

Post Views : 316 पालघर-योगेश चांदेकर शिवसेनेच्या शिंदे गटाला मतदारसंघ न सोडण्याची भूमिका पालघरः विधान…














zzlWzi8qqy8Un4Ec/s320/1001506655.jpg