Breaking News
मुंबई महापालिकेचा चा ग्रीन मास्टरस्ट्रोक! मुंबईतील पालिका कार्यालयांत उभारले जाणार EV चार्जिंग स्टेशन ‘भीषण अपघातात 13 वऱ्हाडींचा मृत्यू” पालघरच्या बापूगावातील 13 मृतांच्या कुटुंबीयांची केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली सांत्वनपर भेट ठाणे, पालघर जिल्ह्यात दोन महिने मासेमारीला बंदी; माशांच्या प्रजोत्पादन काळात मासेमारी केल्यास कठोर कारवाई दिल्लीतील महाराष्ट्र सदनातील प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची अधिकाऱ्यांना तंबी! दहा लाख टन कांदा खरेदीची केंद्राकडे मागणी, सकारात्मक निर्णयाची मुख्यमंत्री फडणवीसांना अपेक्षा
banner 728x90

मुंबई महापालिकेचा चा ग्रीन मास्टरस्ट्रोक! मुंबईतील पालिका कार्यालयांत उभारले जाणार EV चार्जिंग स्टेशन

banner 468x60

Share This:

मुंबई पालिकेने सर्व वॉर्ड कार्यालयांमध्ये EV चार्जिंग स्टेशन उभारण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
पालिका आता पेट्रोल-डिझेल वाहनांच्या जागी टप्प्याटप्प्याने इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवणार आहे.

अंधेरी आणि बीकेसी येथून या ‘ग्रीन एनर्जी’ प्रकल्पाची सुरुवात होणार आहे.
मुंबईतील पालिकेच्या सर्व वॉर्ड प्रशासकीय विभाग कार्यालयांमध्ये इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन्स उभारण्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली आहे. यासोबतच आगामी काळात पालिका अधिकाऱ्यांच्या वापरासाठी असलेले पारंपरिक पेट्रोल आणि डिझेल वाहने टप्प्याटप्याने बदलून त्या जागी इलेक्ट्रिक वाहने आणण्याची तयारीही पालिकेने चालवली आहे. नुकत्याच स्थायी समितीत झालेल्या विरोध आणि सूचनांनंतर प्रशासनाने या हालचाली केल्या आहेत.

कार्बन उत्सर्जन कमी करणे, पर्यावरण संवर्धन आणि इंधनावरील अवलंबित्व कमी करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. तसेच देशभरात वाढणारे प्रदूषण आणि ऊर्जा संकट पाहता स्थानिक स्वराज्य संस्थांनीही हरित ऊर्जा धोरणाचा अवलंब करणे गरजेचे असल्याचे मत प्रशासनाने व्यक्त केले आहे. याच धोरणाचा भाग म्हणून पालिका आता आपल्या प्रशासकीय वाहनांचा ताफा ‘ग्रीन एनर्जी मॉडेल’वर नेण्याच्या तयारीत आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

स्थायी समितीतील आक्षेपानंतर निर्णय

पालिकेने नुकताच २२ सहाय्यक आयुक्तांसाठी ‘वेट लीज’ (चालकासह भाडेतत्वावर) मॉडेल अंतर्गत पाच वर्षांसाठी महिंद्रा स्कॉर्पिओ गाड्या भाड्याने घेण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवला होता. मात्र, या प्रस्तावावर चर्चा करताना अनेक सदस्यानी तीव्र आक्षेप घेतला. केंद्र आणि राज्य सरकार जेव्हा इलेवट्रिक वाहनांना प्रोत्साहन देत आहे, अशा वेळी मुंबई पालिकेने पेट्रोल-डिझेल वाहनांना प्राधान्य का द्यावे? असा सवाल सदस्यांनी उपस्थित केला होता.

अंधेरी, बीकेसीमधून होणार सुरुवात

प्राथमिक टप्प्यात अंधेरी आणि वांद्रे-कुर्ला संकुल येथील पालिका कार्यालयांमध्ये संभाव्य जागांची पाहणी केली जात आहे. त्यानंतर टण्याटप्याने संपूर्ण मुंबईतील वॉर्ड कार्यालयांमध्ये हे नेटवर्क विस्तारले जाईल, भविष्यात पालिकेचे बहुतांश प्रशासकीय वाहन ईव्ही मॉडेलवर आधारित असतील, ज्यामुळे इंधनावरील कोट्यावधी रुपयांचा खर्च वाचेल आणि मुंबईतील प्रदूषण नियंत्रणातही मोठी मदत होईल, असा विश्वास पालिका अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.


मुंबई पालिकेने पर्यावरण रक्षणाच्या बाबतीत एक आदर्श निर्माण केला पाहिजे. प्रशासनाने पेट्रोल-डिझेल वाहनांऐवजी इलेक्ट्रिक वाहनांचा पर्याय निवडून नवीन प्रस्ताव तयार करावा. अधिकाऱ्याऱ्यांच्या कामकाजासाठी वाहने अत्यंत आवश्यक असली, तरी ऊर्जा संवर्धनाच्या दृष्टीने ‘ईव्ही’ मॉडेलवर गांभीयनि विचार झाला पाहिजे. – गणेश खणकर, सभागृह नेते

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!