banner 728x90

मराठा समाजासाठी सरकारचा मोठा निर्णय, जरांगेंच्या उपोषणानंतर थेट आदेश, ते टेन्शनच मिटलं!

banner 468x60

Share This:

राज्यातील मराठा समाजासाठी मोठी बातमी आहे. मराठा आरक्षणाच्या आंदोलना दरम्यान मृत्यू झालेल्या आंदोलकांच्या वारसांना आता एमआयडीसीमध्ये देखील नोकरी मिळणार आहे. सामान्य प्रशासन विभागाकडून याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

मराठा आरक्षण आंदोलनात मृत्यू झालेल्या आंदोलकांच्या वारसांची पडताळणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मृत आंदोलकांच्या पात्र वारसांची पडताळणी करून त्यांना प्रमाणपत्र देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. या प्रमाणपत्राच्या आधारे पात्र वारसांना MIDC मध्ये अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्यात येणार आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

जरांगे पाटलांनी केली होती मागणी

काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या मागणीसाठी उपोषण सुरू केले होते. या उपोषणानंतर सरकारने वेगाने हालचाली करत जरांगे पाटलांच्या मागण्या मान्य केल्या होत्या. त्यानंतर मध्यरात्री जरांगे पाटलांना उपोषण सोडले होते. जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी लढा देताना मृत्यू झालेल्यांच्या वारसांना एमआयडीसीमध्ये नोकऱ्या देण्याची मागणी केली होती. त्यानंतर आता सरकारने तातडीने पावले उचलत याबाबत निर्णय घेतला आहे.

सामान्य प्रशासन विभागाकडून आदेश जारी

मराठा आरक्षणामध्ये मृत्यू पावलेल्या आंदोलकांच्या वारसांना आता मोठा दिलासा मिळाला आहे. मराठा समाजासाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय घेतला आहे. एसटीच्या धर्तीवर आता एमआयडीसीमध्ये देखील वारसांना नोकरी मिळणार आहे. सामान्य प्रशासन विभागाकडून शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांना याबाबत आश्वासन दिले होते, त्यानंतर आता दोनच दिवसात अध्यादेश काढण्यात आला आहे.

मराठा आरक्षण आंदोलनात मृत्यू झालेल्या आंदोलकांच्या वारसांची पडताळणी करण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सामान्य प्रशासन विभागाकडून देण्यात आले आहेत. मृत आंदोलकांच्या पात्र वारसांची पडताळणी करून त्यांना प्रमाणपत्र देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. या प्रमाणपत्राच्या आधारे पात्र वारसांना MIDC मध्ये अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्यात येणार आहे. मराठा आरक्षण आंदोलनातील मृत आंदोलकांच्या कुटुंबियांना दिलासा देण्याच्या दृष्टीने राज्य सरकारची ही महत्त्वाची कार्यवाही मानली जात आहे.

banner 325x300

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!