पालघर– विकलांगता मुक्त पालघर अभियानांतर्गत १८ वर्षे पर्यंत वयोगट अस्थिव्यंग रुग्ण तपासणी शिबिर शनिवार 0६ जून २०२६ रोजी जिल्हा रूग्णालय पालघर येथे पार पडले. विष्णु सवरा सामाजिक न्यास , इनस्टिट्यूट ऑफ
पेडियाट्रिक डिसऑर्डर्स मुंबई व मुस्कान चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी खासदार डॉ. श्री हेमंत विष्णु सवरा यांनी हा संकल्प बोलून दाखवला. पंतप्रधान नरेन्द्र मोदी साहेब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रेरणेने ; महाराष्ट्र राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री स्वर्गीय विष्णु रामा सवरा यांच्या नावाने स्थापन केलेल्या विश्वस्त न्यासच्या माध्यमातून पालघर लोकसभा क्षेत्रात विविध समाज उपयोगी उपक्रम राबविण्याची मुहूर्तमेढ या शिबिराने आज पालघर मध्ये रोवली गेली. उद्घाटन समारंभाच्या प्रसंगी भरतभाई राजपूत भाजपा जिल्हाध्यक्ष, मातोश्री श्रीमती जयश्रीताई सवरा, प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ. तरल नागदा, भाजपाचे जेष्ठ नेते श्री बाबाजी काठोळे ,शिवसेना पालघर जिल्हाप्रमुख कुंदन संखे नगराध्यक्ष उत्तम घरत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.रामदास मराड, डॉ. जयदीप ढमेले, भावानंद संखे, ऍड जयेश आव्हाड , वाडा नगराध्यक्षा रिमाताई गंधे, कैलास म्हात्रे ,निशाताई सवरा आदी मान्यवर उपस्थित होते.
पालघर जिल्ह्यातून एकूण १८२ अस्थी विकलांग रुग्णांनी शिबिराचा लाभ घेतला. यापैकी ६२रुग्णांवर आवश्यक शस्त्रक्रिया ज्युपिटर हॉस्पिटल ठाणे येथे करण्यात येणार आहेत. ४० रुग्णांना कृत्रिम अवयव व सहाय्यक साधनांच्या माध्यमातून विकलांगतेवर मात करण्यासाठी मदत करण्यात येणार आहे. प्रत्येक तालुका पासून पालघर पर्यंत मोफत प्रवास सेवा, नाश्ता- भोजन, तातडीचा औषध उपचार अशा सर्व सुविधा विष्णू सवरा सामाजिक न्यास यांच्या माध्यमातून पुरविण्यात आली. पालघर जिल्हा आरबीएसके टीम यांच्या माध्यमातून रुग्ण संपर्क व इतर बहुमोल सहकार्य शिबिरामध्ये लाभले. शिबिराचे सर्वांगसुंदर आयोजन व नियोजन याबाबत रुग्णांचे नातेवाईक उपस्थित पाहुणे व मान्यवर यांनी खासदार डॉ. हेमंत सवरा व त्यांचे व भाजपचे सर्व पदाधिकारी व मित्र मंडळ यांचे अभिनंदन केले. भविष्यात पालघर जिल्हा विकलांग मुक्त करण्यासाठी विकलांगतेच्या सर्व समस्यांवर कालबद्ध कार्यक्रम राबविण्यासाठी विष्णु सवरा सामाजिक न्यास सोबत अखंड काम करत राहणार अशी आश्वासक भावना डॉ तरल नागदा यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे अध्यक्ष भरत राजपूत यांनी खासदार डॉक्टर हेमंत विष्णु सवरा यांच्या कामाची शैली, सातत्य व अभ्यासू वृत्ती, याबाबत कौतुकाची भावना व्यक्त केली. आपल्या राजकीय सोबती बरोबरच प्रत्येक सामाजिक हिताच्या उपक्रमामध्ये आम्ही सदोदित आपल्या सोबत आहोत अशी भूमिका कुंदन संखे यांनी व्यक्त केली. शिबिरात उपस्थित सर्व मान्यवर, रुग्ण नातेवाईक, आयोजनातील सहकार्य करणाऱ्या प्रत्येक घटकाचे डॉ. हेमंत सवरा यांनी आभार मानले.
शिबिर यशस्वी करण्यासाठी विश्वस्त न्यास चे स्वयंसेवक, जिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर कर्मचारी, आर बी एस के पालघर जिल्हा,आशा सेविका पालघर जिल्हा यांचे बहुमोल सहकार्य लाभले.

विकलांगता मुक्त पालघरसाठी कटिबद्ध! खा. डॉ हेमंत सवरा
Recommendation for You

Post Views : 326 पालघर-योगेश चांदेकर नागरिकांच्या माहितीसाठी उपयुक्त उपक्रम पालघरः पालघऱ तसेच जिल्ह्यातील अन्य…

Post Views : 326 राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा’ (नीट) देणाऱ्या राज्यातील विद्यार्थ्यांसाठी पारदर्शक आणि…

Post Views : 326 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्यभर राबविण्यात येणाऱ्या ‘हरित महाराष्ट्र –…














zzlWzi8qqy8Un4Ec/s320/1001506655.jpg