banner 728x90

सासूने आपल्या सुनेला किडनी देऊन वाचवले तिचे प्राण, जाणून घ्या काय आहे प्रकरण

banner 468x60

Share This:

कालचं मकर संक्रांतीचा उत्सव संपूर्ण देशात मोठ्या धुमधडाक्यात पार पडला. औरंगाबाद नजीकच्या लासूर स्टेशन गावातील सुनेला तिच्या सासुने अनोख वान दिलं असचं म्हणता येईल. योगिता संजय जैस्वाल या गेल्या वर्षांपासून किडनीच्या आजाराने त्रस्त होत्या. कित्येक महिन्यांपासून त्यांच्यावर डायलेसीस करावे लागत होते. दोन्ही किडन्या निकामी झाल्याने डॉक्टरनी त्यांना किडनी प्रत्यारोपणाचा सल्ला दिला. मात्र त्याच रक्त गटाची किडनी मिळणे सोपे नव्हते.

नातेवाइक तसेच इतरांची किडनी त्यांना जुळत नव्हती. पण योगिताची सासू रत्नाबाई जैस्वाल यांची किडनी मात्र सुनेच्या किडनीस मॅच झाली. क्षणाचाही विलंब न करता सासु बाईंनी सुनेला किडनी देण्यास होकार दिला. दोघींच्या सर्व वैद्यकीय चाचण्या केल्यानंतर त्यांची किडनी सुनेसाठी जुळेल असे स्पष्ट झाले. त्यानंतर 14 जानेवारीला संक्रांतीच्या पूर्व संध्येला शस्त्रक्रियेला सुरुवात झाली आणि तब्बल नऊ तास चाललेली ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली.

banner 325x300

सासूने आपल्या सुनेला किडनी देऊन तिचे प्राण वाचवले आहे. डॉक्टरांनी या धाडसी सासूचे मोठे कौतुक केले आहे. तरी सासु सुनेच्या नात्यात सासुबाईंनी हे नवं अनोख उदाहरण रचलं आहे. किडनी डोनेट केलेल्या सासूचं वय 64 वर्ष सुन तिने तिच्या लेकाच्या आणि सुनेच्या सुखी संसारासाठी स्वतची किडनी सुनेला दान केल्याचं सांगितलं आहे.

मराठवाड्यासारख्या मागासलेल्या आणि एवढ्या दुर्गम भागात एवढे सुसंस्कृत आणि पुढारलेल्या विचारांचा नवा पयंडाचं सासु रत्नाबाई यांनी रचला आहे. तरी मकर संक्रांती निमित्त सासुने सुनेला दिलेल्या या अनोख्या वानाची चर्चा संपूर्ण राज्यात होत आहे. तरी किडनी ट्रान्सप्लांटची ही शस्त्रक्रीया तामिळनाडूतील कोईमतूरमध्ये पार पडली आहे.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!