मुंबई ते नागपूर असा प्रवास त्यांनी केला. यावेळी देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये चर्चाही झाल्याची माहिती आहे. या विमानात आदित्य ठाकरे, संजय राऊत, विनायक राऊत अनिल देसाई हेदेखील उपस्थित असल्याचं दिसून आलं.
राज्यात ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून सहा खासदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे एकाच विमानातून प्रवास करताना दिसून आलं. दरम्यान, ‘आपण भेटलो हीच मोठी बातमी आहे’ असं देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना म्हणाल्याची माहिती आहे.
यावेळी देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची चर्चा झाली असून दोन्ही नेत्यांनी एकमेकांची विचारपूस केल्याची माहिती आहे. तसेच देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांचीही चर्चा झाल्याचं दिसून आलं.
2019 पासून देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये राजकीय वितृष्ठ आलं आणि दोघांच्या राजकारणाचा मार्ग वेगळा झाला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये मोठी फूट झाली. लोकसभा निवडणुकीत नऊ खासदार निवडून आल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी पुन्हा उद्धव ठाकरेंचे सहा खासदार फोडले.
खासदार फुटीनंतर उद्धव ठाकरे यांनी त्या त्या लोकसभा मतदारसंघाचा दौरा करण्याचं निश्चित केल्याचं दिसतंय. 27 जून रोजी उद्धव ठाकरे यांचा यवतमाळवाशिमचा दौरा आहे. त्या निमित्ताने ते नागपूरला जात आहेत. त्याच विमानात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित होते. त्यामुळे याची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
विमानात कोण कोण?
उद्धव ठाकरे यांच्यासोबत यावेळी आदित्य ठाकरे, संजय राऊत, विनायक राऊत, अनिल देसाई हे नेते उपस्थित होते.
Home
महाराष्ट्र
उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; बाजूला आदित्य ठाकरे तर मागच्या सीटवर संजय राऊत अन् अनिल देसाई
उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; बाजूला आदित्य ठाकरे तर मागच्या सीटवर संजय राऊत अन् अनिल देसाई
Recommendation for You

Post Views : 664 राज्य सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. सरकारने काही दिवसांपूर्वीच राज्यातील…

Post Views : 664 राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडे पुन्हा एकदा अर्थखातं सोपवलं जाणार असल्याच्या…

Post Views : 664 नीती आयोगाने मुंबई महानगर प्रदेशाच्या विकासातून सुमारे १.५ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था…

Post Views : 664 देशात आरक्षणाच्या मुद्यावरून चर्चा-वादविवाद सुरू असताना दुसरीकडे अनुसूचित जाती-जमातींच्या प्रवर्गाला आरक्षणासाठी…

Post Views : 664 देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनडीएमधील खासदारांना मोठा कानमंत्र दिला. बुधवारी…












zzlWzi8qqy8Un4Ec/s320/1001506655.jpg