banner 728x90

मुंबईत मध्यरात्री पावसाची बॅटिंग! घरात पाणी शिरलं, रस्ते तुंबले; कुठे कुठे सरी बरसल्या?

banner 468x60

Share This:

चार दिवसांच्या विश्रांतीनंतर मुंबईत पावसाने दमदार हजेरी लावली आहे. आज मध्यरात्रीपासून मुंबईच्या अनेक भागात पावसाच्या सरी बरसल्या. या पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

मुसळधार पावसाने अनेक सकल भागात पाणी साचण्यासही सुरुवात झाली असून आज दिवसभरही पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.

कोणकोणत्या भागात सरी बरसल्या?

सोमवारी मध्यरात्री मुंबईसह उपनगरांमध्ये जोरदार पाऊस झाला. शहरातील अंधेरी, साकीनाका, बीकेसी, मुलूंड, बोरिवली, कांदिवली भागात दमदार पाऊस झाला. या पावसाने अनेक भागात पाणी साचले. मुलूंड वेस्ट भागातील एलबीएस रोडवर पाणी साचल्याने वाहनचालकांचे हाल झाल्याचे पाहायला मिळाले. आज सकाळीही आकाशात काळे ढग दाटले असून पावसाच्या हलक्या सरी बरसत आहेत.

रविवारी रात्री कल्याणमध्येही मुसळधार पाऊस सुरू झाला. या अर्ध्या तासाच्या पावसात कल्याण पश्चिम येथील नवनाथ नगर परिसरात पावसाच्या पाणी लोकांच्या घरात शिरल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून नालेसफाई संदर्भात दावा फोल ठरला आहे. अर्धा तासाचा पावसात पाणी नागरिकांच्या घरात शिरल्याने केडीएफसीच्या नालेसफाईच्या दावे प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे.

दुसरीकडे, पहिल्याच पावसात उल्हासनगरातील नालेसफाईचा फज्जा उडाला आहे. महापालिकेचा नालेसफाईचा दावा फोल झाला असून अमन टॉकीज रोडवर पाणी साचले आहे. काही मिनिटांच्याच पावसाने उल्हासनगरातील रस्ते पाण्याखाली गेले आहेत. या नागरिकांना रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून वाट काढावी लागत आहे.

कुठे किती पाऊस?

शहरात दक्षिण मुंबईच्या तुलनेत मुंबईच्या पश्चिम आणि पूर्व उपनगरात जास्त पाऊस झाला. उत्तर उत्तर कार्यालय परिसरात ३४.४ मिली, रावळी कॅम्प २७.४२ मिली पावसाची नोंद, दादर अग्निशमन केंद्र २७.२ मिली, वरळी अग्निशमन केंद्र २३.४ मिली, बी नाडकर्णी पार्क मु. शाळा, वडाळा २२. वेस्टर्नंला वर्सोवा WWTF आणि लॅगून्स १५१.६, वर्सोवा पंपिंग स्टेशन 112, प्रतीक्षा नगर मुन. स्कूल, ओशिवरा, १०३.४, दिंडोशी अग्निशमन केंद्र, ९६.६, चिंचोली अग्निशमन केंद्र, ९३.८ इतक्या पावसाची नोंद झाला. तर ईस्टर्न भागात वीणा नगर मुन. स्कूल, मुलुंड, मिठागर नगरपालिका, मुलुंड, एस कार्यालय, पस्पोली पवई नगरपालिका स्कूल, पवई, गव्हाणपाडा अग्निशमन केंद्र, १५८, ११७.८, ११५.६, ११२.४, 112 एवढ्या पावसाची नोंद झाली.

>

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!