banner 728x90

संगीत कलाकारांना १० लाख रुपये मिळणार, गायिका आशा भोसले यांच्या नावाने ‘जीवन गौरव पुरस्कार’ सुरू होणार; सरकारचा मोठा निर्णय

banner 468x60

Share This:

महाराष्ट्र सरकारकडून नेहमीच महिला, विद्यार्थी, तरुण, दिव्यांग आणि शेतकरी यांसाठी नवनवीन योजना सुरु केल्या जातात. अशातच संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ कलाकारांचा सन्मान करण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

लता मंगेशकर जीवन गौरव पुरस्काराच्या धर्तीवर प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांच्या नावाने एक नवीन जीवन गौरव पुरस्कार सुरू केला जाणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ कलाकारांचा सन्मान करण्यासाठी महाराष्ट्र सरकार प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांच्या नावाने ‘जीवन गौरव पुरस्कार’ सुरू करणार आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी याबाबत गुरुवार (ता. २) रोजी विधानसभेत ही घोषणा केली आहे. आशा भोसले यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी ८ सप्टेंबर रोजी, हा पुरस्कार प्रदान केला जाणार असून या पुरस्कारामुळे संगीत क्षेत्रात दीर्घकाळ आणि उत्कृष्ट योगदान देणाऱ्या कलाकारांचा सन्मान केला जाणार आहे.

अनेक दशकांपासून आपल्या प्रतिभेने गायन आणि संगीताच्या जगात अमिट छाप सोडणाऱ्या भारतीय संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ कलाकारांच्या योगदानाला मान्यता देणे, हा या पुरस्कारामागचा उद्देश आहे. तसेच हा पुरस्कार कलाकारांच्या नवीन पिढीलाही प्रेरणा देईल, असा सरकारचा विश्वास आहे.

banner 325x300

१० लाख रुपये मिळणार

सरकारच्या निर्णयानुसार ‘ आशा भोसले जीवन गौरव पुरस्कार’ यासाठी निवड झालेल्या कलाकाराला १० लाख रुपयांचे रोख रक्कम, शाल आणि नारळ देऊन सन्मानित केले जाणार आहे. तसेच हा सन्मान केवळ आर्थिक पुरस्कारापुरता मर्यादित राहणार नसून संगीत क्षेत्रातील आजीवन कामगिरी आणि समर्पणाचे प्रतीक म्हणूनही काम करेल.

दरम्यान, या पुरस्कारासाठी पात्रतेचे निकष आणि निवड प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी संगीत आणि गायन क्षेत्रातील तज्ज्ञांची समिती स्थापन केली जाणार आहे. या समितीकडून पुरस्कारासाठी पात्र कलाकारांची निवड केली जाणार आहे. हा पुरस्कार गुणवत्तेच्या आधारावर दिला जाणार असल्यामुळे या पुरस्काराची प्रतिष्ठा कायम राहील, हे सरकारचे उद्दिष्ट आहे.

आशा भोसले या भारतीय संगीतातील एक महान व्यक्तिमत्व आहेत, ज्यांच्या आवाजाने आणि योगदानाने भारतीय संगीताला केवळ देशातच नव्हे तर जगभरात एक नवी ओळख दिली आहे. त्यांच्या नावाने सुरू करण्यात येणारा जीवन गौरव पुरस्कार संगीतकारांना ओळखीसाठी एक नवीन व्यासपीठ उपलब्ध करून देईल. तसेच महाराष्ट्र सरकार कला, संस्कृती आणि संगीताचे जतन व संवर्धन करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. लता मंगेशकर यांच्या नावावरील पुरस्कारानंतर, सांस्कृतिक अस्मितेप्रती असलेली राज्य सरकारची बांधिलकी आता आशा भोसले यांच्या नावाने हा पुरस्कार स्थापित करत आहे.

– मंत्री आशिष शेलार

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!