banner 728x90

‘कथीत सेवा आश्रम शिक्षण संस्था बोईसरचा बेकायदेशीर कारभार, पदाचा दुरुपयोग करणाऱ्यांवर फौजदारी कारवाईची मागणी

banner 468x60

Share This:

पालघर-योगेश चांदेकर
धर्मादाय आयुक्त, शिक्षण विभागाचे कारवाईकडे दुर्लक्ष
संस्थेचा पत्ता एक, कारभार दुसरीकडून!

पालघर: अस्तित्वात नसलेल्या ‘सेवा आश्रम शिक्षण संस्था, बोईसर’ या नावाने लेटरहेड तयार करून शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या नेमणुका, बदल्या, आर्थिक व्यवहार आणि प्रशासकीय आदेश काढण्यात आल्याचा आरोप करत संबंधित ‘फिट पर्सन’ व इतरांविरोधात फौजदारी कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात सेवा आश्रम शिक्षण संस्था, मुरबेचे विषवस्थ समर्थ वनारसे यांनी शिक्षणमंत्री, धर्मादाय आयुक्त, शिक्षण विभाग आणि पोलिस प्रशासनाकडे सविस्तर तक्रार दाखल केली आहे.
‘सेवा आश्रम शिक्षण संस्था, मुरबे’ हीच नोंदणीकृत आणि मान्यताप्राप्त संस्था असून ‘सेवा आश्रम शिक्षण संस्था, बोईसर’ या नावाची कोणतीही नोंदणीकृत संस्था अस्तित्वात नाही. असे असतानाही काही ‘फिट पर्सन’ आणि इतर संबंधितांनी या नावाने लेटरहेड, शिक्के आणि स्वाक्षऱ्यांचा वापर करून संस्थेचा कारभार चालविल्याचा आरोप करण्यात आला आहे. तक्रारीत म्हटले आहे, की या कथित संस्थेच्या नावाने शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या नेमणुका, बदल्या, वेतनविषयक आदेश, आर्थिक व्यवहार तसेच प्रशासकीय निर्णय घेण्यात आले. यासाठी धर्मादाय प्राधिकरणाच्या आदेशांचा चुकीचा उल्लेख करण्यात आल्याचाही दावा करण्यात आला आहे.

banner 325x300

जिल्हा परिषदेच्या माध्यमीक शीक्षण विभागाचा आदेश धाब्यावर
या प्रकरणी जिल्हा परिषद माध्यमीक शिक्षण विभागाने संबंधित इतर दोन फिट पर्सनना नोटीस बजावून ‘सेवा आश्रम शिक्षण संस्था, बोईसर’ या नावाने कोणतीही नोंदणीकृत संस्था नसल्याचे स्पष्ट केल्याचा उल्लेख तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच अशा नावाने संस्थेचा कारभार सुरू ठेवण्यात आल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आल्याचे नमूद करण्यात आले; परंतु कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. तक्रारदाराने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी संस्थेच्या सर्व प्रशासकीय व आर्थिक व्यवहारांचे विशेष लेखापरीक्षण (स्पेशल ऑडिट) करण्याची मागणी केली आहे. याशिवाय, बँक व्यवहार, निधीचा वापर, शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या नेमणुका, बदल्या, वेतन आणि इतर प्रशासकीय निर्णयांची स्वतंत्र चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. बनावट लेटरहेड, शिक्के आणि कागदपत्रांचा वापर करून शासकीय व धर्मादाय प्राधिकरणांची दिशाभूल केल्याप्रकरणी संबंधितांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशीही मागणी तक्रारीत करण्यात आली आहे. आवश्यक असल्यास प्रकरण उच्च न्यायालयात नेण्याचा इशारा तक्रारदाराने दिला आहे.

फिट पर्सन’चे आदेश
सेवा आश्रम शिक्षण संस्थेच्या फिट पर्सनकडून सेवा आश्रम विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, मुरबेच्या मुख्याध्यापकांना कार्यभार हस्तांतरणाबाबत आदेश देण्यात आले आहेत. यासंदर्भात ३० एप्रिल २०२४ रोजी मुख्याध्यापकांना पत्र पाठविण्यात आले आहे. पत्रानुसार, मुख्याध्यापक वंदना राऊत यांची सांगली जिल्ह्यातील गव्हाण (ता. तासगाव) येथील शाळेत प्रशासकीय कारणास्तव बदली झाल्यामुळे त्यांनी मुरबे येथील सेवा आश्रम विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुख्याध्यापक पदाचा कार्यभार सोडून तो वरिष्ठ शिक्षक भूपेश संखे यांच्याकडे तातडीने सुपूर्द करावा, असे निर्देश देण्यात आले. ‘फिट पर्सन’ सुनील रामचंद्र भोईर यांनी दिलेल्या या पत्रात शिक्षण विभागाच्या पत्राचा तसेच संस्थेच्या पूर्वीच्या पत्रव्यवहाराचा संदर्भ देण्यात आला आहे. कार्यभार स्वीकारल्यानंतर त्याचा अहवाल संबंधित कार्यालयांना सादर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. परंतु हे सर्व बदली प्रक्रिया राबविण्याचे अधिकार नसतांनाही हे सर्व आदेश धाब्यावर बसवून अस्तीत्वात नसलेल्या सेवा आश्रम शिक्षण संस्था बोईसर या नावाचे लेटरहेड व सही शिक्का वापरून नियमबाह्य प्रक्रिया राबवत सदर फिट पर्सन जिल्हा परिषदेचे माध्यमीक विभागाचे जिल्हाशिक्षणाधिकारी अशोक पाटील, निरीक्षक धर्मादाय आयुक्त कार्यालय पालघर अशोक उंबरे, सुनील भोईर यांनी केले आहे

तक्रारदारांच्या मागण्या
सेवा आश्रम शिक्षण संस्था बोईसर या संस्थेच्या नोंदणीची पडताळणी करण्यात यावी.
कथित बोगस नावाने जारी करण्यात आलेल्या आदेशांची चौकशी करण्यात यावी.
संबंधित प्रशासकीय व आर्थिक निर्णयांची वैधता तपासण्यात यावी.
आवश्यक असल्यास विशेष लेखापरीक्षण करण्यात यावे.
संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करून जबाबदारी निश्चित करण्यात यावी. अशा मागण्या करण्यात आल्या आहेत

जिल्हा शिक्षणाधिकारी अशोक पाटील यांची सेवा आश्रम शिक्षण संस्था मुरबे चे फिट पर्सन म्हणून नेमणूक करुनसुद्धा ते सेवा आश्रम शिक्षण संस्था बोईसर चे लेटर हेड व सही शिक्का वापरत आहेत

जिल्हा शिक्षणाधिकारी अशोक पाटील यांची सेवा आश्रम शिक्षण संस्था मुरबे चे फिट पर्सन म्हणून नेमणूक करुनसुद्धा ते सेवा आश्रम शिक्षण संस्था बोईसर चे लेटर हेड व सही शिक्का वापरत आहेत

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!