banner 728x90

तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! अन्न, औषधाची तक्रार करणे झाले सोपे; FDAचं हायटेक पोर्टल लॉन्च

banner 468x60

Share This:

औषधांच्या सुरक्षिततेबाबत ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण अधिक प्रभावीपणे करण्यासाठी महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.

प्रशासनाने आता तक्रार नोंदवण्यासाठी एक अत्याधुनिक ऑनलाइन पोर्टल (complaints.mahafda.in) सुरू केले आहे. या पोर्टलचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (AI) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.

तुकाराम मुंढेंचा मास्टरस्ट्रोक

अनेकदा ग्राहकांना भेसळयुक्त अन्न किंवा निकृष्ट दर्जाच्या औषधांबाबत तक्रार करायची असते, परंतु ती कशी मांडावी, यात तांत्रिक अडचणी येतात. आता या नवीन प्रणालीमुळे ग्राहकांना केवळ बोलून आपली तक्रार नोंदवता येणार आहे. मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेत आपली समस्या सांगितल्यास, AI स्वतःहून ती तक्रार स्पष्ट आणि मुद्द्यांच्या स्वरूपात तयार करेल.

यामुळे तक्रारदारांचा वेळ वाचणार असून तक्रारीचे स्वरूप अधिक अचूक होणार आहे. या व्यासपीठावर अन्न सुरक्षा आणि औषध सुरक्षा या दोन्ही प्रकारच्या तक्रारी एकाच ठिकाणी करता येतील. ग्राहकांना आपली तक्रार सबमिट केल्यानंतर तिची सद्यस्थिती (Track Status) पाहण्याची सोयही उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रशासनाचा हा निर्णय जनसामान्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचा दिलासा मानला जात आहे.

banner 325x300

हे पोर्टल कसे वापराल?

आता कोणताही नागरिक मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेत बोलून भेसळयुक्त अन्न, बनावट किंवा निकृष्ट दर्जाची औषधे तसेच सार्वजनिक आरोग्याशी संबंधित कोणत्याही उल्लंघनाबाबत तक्रार नोंदवू शकतो.


कृत्रिम बुद्धिमत्ता तक्रार आपोआप तयार करते, ती संबंधित अधिकाऱ्याकडे पाठवते, विलंब झाल्यास स्वयंचलित एस्कलेशन करते आणि तक्रारीचा संपूर्ण प्रवास पारदर्शकपणे ट्रॅक करता येतो. नागरिकांचा सहभाग, तंत्रज्ञानाची ताकद आणि प्रशासनाची उत्तरदायित्व यांचा संगम घडवून सार्वजनिक आरोग्य संरक्षण अधिक प्रभावी करण्याचा हा प्रयत्न आहे. प्रत्येक तक्रार महत्त्वाची आहे, कारण प्रत्येक नागरिक महत्त्वाचा आहे.


अन्न असो किंवा औषध, फक्त बोला – तक्रार आपोआप तयार होईल.


भेसळयुक्त अन्नपदार्थ किंवा बनावट, निकृष्ट दर्जाच्या औषधांबाबत तक्रार नोंदवणे आता अत्यंत सोपे झाले आहे. आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र शासनाच्या AI-आधारित व्यासपीठावर मराठी, हिंदी किंवा इंग्रजीत बोला – तुमची तक्रार स्पष्ट व पूर्ण मुद्द्यांत आपोआप तयार होईल.


अन्न सुरक्षा असो वा औषध सुरक्षा – दोन्ही तक्रारींसाठी एकच व्यासपीठ.

तक्रार नोंदवण्यासाठी: https://complaints.mahafda.in एका क्लिकवर तक्रार सबमिट करा आणि तिची स्थिती ट्रॅक करा. तुमची जागरूकता म्हणजेच सर्वांची सुरक्षा. आजच तक्रार नोंदवा.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!