banner 728x90

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी ‘तारीख पे तारीख’! कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी कारणांसह नवी डेडलाईन सांगितली

banner 468x60

Share This:

राज्यसरकारनेजाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी कर्जमाफीची (Farm Loan Waiver) सध्या जोरदार प्रक्रिया सुरू आहे. अशातच या योजनेअंतर्गत (Punyashlok Ahilyadevi Holkar Farmers Loan Waiver Scheme) शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी (Farm Loan Waiver List) दिली जात आहे.

मात्रअद्यापअनेक शेतकऱ्यांच्या(Farmer Loan Waiver) खात्यातपैसेजमानझाल्याने बळीराजा परीक्षेतअसल्याचेचित्रआहे. अशातचआताराज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharne) यांनी कर्जमाफीच्या संदर्भात एक मोठं वक्तव्य केलंय. ‘पुढील दोन ते चार दिवसात पाच ते दहा हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील, अशीमाहितीत्यांनीदिलीआहे. ते वाशिम इथेबोलतहोते.
दरम्यान, अँग्रीस्टॅगच्या माध्यमातून कर्जमाफीच्या याद्या पडताळण्याचं काम प्रगती पथावर आहे. आता शासनाकडे पैसे उपलब्ध आहेत. त्यामुळे जशी यादी अद्यावत होईल तसतसे खात्यात पैसे जमा होतील. कर्जमाफीमुळे 40 हजार 585 कोटी रुपयांची रक्कम शेतकऱ्यांना लाभ होईल. अशी माहिती कृषिमंत्री तथा वाशिमचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी वाशीम इथ दिलीये.

banner 325x300

शहरी भागातील शेतकऱ्यांना सिंचन विहीर आणि इतर योजनांचा लाभ मिळत नसल्याचं पत्रकारांनी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर. मला या संदर्भात कल्पना नसल्याची कबुली देत लवकरच शहरी भागातील शेतकऱ्यांनाही सर्व योजनांचा लाभ देण्यासाठी तरतूद करू, असं आश्वासन भरणे यांनी वाशिम मध्ये पत्रकारांशी बोलताना दिलय.

राज्यातील ज्या शेतकऱ्यांची नावे सातबारा उताऱ्यावर नाहीत किंवा इतर अधिकारात ज्यांच्या नावांची नोंद नाही, अशा सर्व शेतकऱ्यांना रेकॉर्डवर आणण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील तब्बल २ लाख ३१ हजार शेतकऱ्यांचा ‘ॲग्रीस्टॅक’ मिळण्याचा मार्ग मोकळा होणार असून, त्यांना कर्जमाफी आणि इतर शासकीय योजनांचा लाभ मिळणे सुलभ होणार आहे. यासंदर्भात सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी १५ दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश महसूलमंत्र्यांनी दिले आहेत.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!