मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागण्यांसाठी गेल्या नऊ दिवसांपासून जालना येथील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरु आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या उपोषणाचा आजचा दहावा दिवस आहे.
मध्यंतरीच्या काळात त्यांनी सलाईन लावली असली तर मनोज जरांगे यांची प्रकृती बिघडत चालली आहे. यामुळे मराठा आंदोलकांमधील अस्वस्थता वाढत चालली आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारच्या (Maharashtra Government) पातळीवर हालचाली सुरु आहेत. याचाच एक भाग म्हणून राज्य सरकारने चार महत्त्वाचे निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. (Maratha Kunbi)
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठे निर्णय घेत चार विविध शासकीय आदेश (जीआर/पत्रे) जारी केले आहेत. या निर्णयांद्वारे मराठा, कुणबी व SEBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मोठा शैक्षणिक व रोजगाराचा दिलासा देण्यात आला आहे.
राज्य सरकारकडून काढण्यात आलेल्या चार निर्णयांचा तपशील
1. मराठा समाजाला OBC प्रमाणे शैक्षणिक सवलती (तंत्रशिक्षण संचालनालय) तंत्रशिक्षण संचालनालयाने (DTE) सर्व विभागीय कार्यालये व विद्यापीठांना निर्देश जारी केले आहेत. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून मराठा समाजातील विद्यार्थ्यांना इतर मागास वर्ग (OBC) प्रवर्गाप्रमाणे सर्व शैक्षणिक सवलती व सोयी-सुविधांचा लाभ तातडीने लागू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
2. डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्त्यासाठी २०० कोटींचा निधी (उच्च व तंत्रशिक्षण विभाग) EBC, EWS आणि SEBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या प्रलंबित वसतिगृह निर्वाह भत्त्यासाठी २०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करून वितरीत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पावसाळी अधिवेशनातील पुरवणी मागणीद्वारे हा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
3. सारथी ‘परदेश शिक्षण शिष्यवृत्ती’ धोरणात सुधारणा (नियोजन विभाग) सारथी संस्थेमार्फत दिल्या जाणाऱ्या परदेशी शिष्यवृत्तीत सामाजिक न्याय विभागाच्या धोरणानुसार सुधारणा करण्यात आली आहे. यानुसार परदेशी विद्यापीठांची शिक्षण फी थेट संस्थेस अदा केली जाईल, ज्यामुळे लाभाच्या रकमेवरील कमाल मर्यादा काढली गेली आहे. तसेच विद्यार्थ्यांना दरवर्षी १५०० यूएस डॉलर (यूकेसाठी ११०० जीबीपी) अतिरिक्त निर्वाह/आकस्मिक भत्ता मंजूर करण्यात आला असून QS Ranking वर आधारित नवीन गुणवत्ता यादी कार्यपद्धती लागू करण्यात आली आहे.
4. सारथीमार्फत १,४४० तरुणांना मोफत ड्रायव्हिंग व कंडक्टर प्रशिक्षण (सारथी, पुणे) सारथी’ संस्थेने IDTRS पिंपरी-चिंचवड यांच्याशी सामंजस्य करार करून १,४४० मराठा व कुणबी तरुणांसाठी LMV, HMV ड्रायव्हिंग आणि कंडक्टर प्रशिक्षणाचा कार्यारंभ आदेश जारी केला आहे. १ ऑक्टोबर २०२६ पासून हे प्रशिक्षण सुरू होणार असून, किमान १,००० लाभार्थ्यांना रोजगार किंवा स्वयंरोजगार मिळवून देणे बंधनकारक करण्यात आले आहे
हैदराबाद गॅझेटिअरनुसारच्या नोंदी गावपातळीवर लावण्याच्या हालचाली
कुणबी नोंदी आणि हैदराबाद गॅझेटिअरनुसार मिळालेल्या नोंदी गाव पातळीवर लावण्याबाबत आढावा बैठक सुरु आहेत. राधाकृष्ण विखे पाटील यांची मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यातील अधिकारी आणि विभागीय आयुक्त सोबत बैठक सुरु आहे. संभाजीनगर जिल्ह्यातील नोंदी मोबाईलवर पाहता येणार, संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी वेबसाईटवर सर्व नोंदी टाकल्याची माहिती दिली. सोबतच गावपातळीवर जिथे जिथे ज्या गावच्या नोंदी सापडल्या, तिथे ग्रामपंचायत त्यावर लावण्यात येत असल्याचे सांगितले. गाव पातळीवर सगळ्याच ठिकाणी नोंदी लावण्याबाबतच्या सूचना राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत. एक जिल्ह्याच्या वेबसाईटवर नोंदी टाकण्यासंदर्भात सूचना करण्यात आलेले आहेत.


















zzlWzi8qqy8Un4Ec/s320/1001506655.jpg