पालघर : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी जपत शिरगाव मांगेलआळी परिवारातर्फे गणेशमूर्ती विसर्जनासाठी समुद्रात विनामूल्य होडीसेवा तसेच आवश्यक मनुष्यबळाची सेवा उपलब्ध करून देण्यात आली. या उपक्रमाच्या माध्यमातून गणेशभक्तांना सुरक्षित व सुलभ पद्धतीने बाप्पाचे विसर्जन करता यावे, हा उद्देश ठेवण्यात आला.
गणेश विसर्जनाच्या दिवशी पालघर शहरासह परिसरातील अनेक गावांमधून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे तसेच घरगुती गणपतींच्या भक्तांनी या विनामूल्य सेवेचा लाभ घेतला. गणेशमूर्ती समुद्रात सुरक्षितपणे विसर्जित करण्यासाठी होडीची व्यवस्था, तसेच विसर्जनासाठी येणाऱ्या भाविकांना आवश्यक सहकार्य करण्यासाठी परिवारातील सदस्यांनी मनुष्यबळ उपलब्ध करून दिले.
गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता समाजसेवा, सहकार्य आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देणारा उत्सव ठरावा, या भावनेतून शिरगाव मांगेलआळी परिवाराने हा उपक्रम राबविला. कोणतेही शुल्क न घेता गणेशभक्तांना सेवा देत या परिवाराने समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. या उपक्रमामुळे गणेशभक्तांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, “सेवा हीच खरी गणेशभक्ती” या भावनेचा प्रत्यय या उपक्रमातून आला.


















zzlWzi8qqy8Un4Ec/s320/1001506655.jpg