banner 728x90

सेवा विवेक चा आत्मनिर्भर आदिवासी महिला सन्मान सोहळा

banner 468x60

Share This:

पालघर-योगेश चांदेकर

पालघर वसई तालुक्यातील नामांकित सेवा विवेक संस्थेने आदिवासी महिला सन्मान सोहळ्याचे आयोजन केले होते. विरार पूर्वेला राष्ट्रीय महामार्गाजवळ भालिवली येथे बुधवार दि. 23 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 11 वा. आयोजित केलेल्या या सोहळ्यास हिंदुस्तान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष तथा सेवा विवेक चे मार्गदर्शक पद्मश्री रमेश पतंगे, आदिवासी क्षेत्र आढावा समितीचे अध्यक्ष (मंत्री दर्जा) विवेक पंडित, आमदार राजेंद्र गावित, मुंबई विद्यापीठाचे डॉ. बळीराम गायकवाड, सेवा विवेकचे संचालक प्रदीप गुप्ता, रा. स्व. संघाचे शिरसाट तालुका संघचालक दयानंद कुडू आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

banner 325x300

प्रदीप गुप्ता आपल्या प्रास्ताविकात म्हणाले, सेवा विवेक गेली 16 वर्षे कार्यरत असून विवेक पंडित यांनी आदिवासी समाजासाठी देह झिजवला. आम्ही या सूर्यासमोर काजवा आहोत. रा. स्व. संघाच्या प्रेरणेने आम्ही हे कार्य सुरू केले. आदिवासी महिलांच्या राख्या केंद्रात पोहोचल्या, त्याला उदंड प्रतिसाद मिळाला. समाजाच्या उत्कर्ष व उन्नतीसाठी कार्य सुरू केले. आदिवासी महिलांचे बँक खाते उघडले. ग्राम विकासाचे काम सेवा विवेकच्या माध्यमातून व स्वास्थ्य, मुलांचे शिक्षण, आत्मसन्मान देण्याचे काम सुरू आहे. रोप लागवड, शेती, पर्यावरण रक्षणाचे काम सुरू आहे. ग्राम विकासाच्या कामात बांबू पासून विविध वस्तू बनवणे व त्याची मार्केटिंग यातून बांबू सेवक तयार झाले. सेवा विवेकच्या माध्यमातून एकही पैसा खर्च न करता आपली सेवा देत असलेले हे बांबू सेवक व्यक्ती विशेष किंवा व्यक्ती प्रथम नाही, तर राष्ट्र प्रथम ही संकल्पना उराशी बाळगून आदिवासी समाजाचे उत्थान करणे हेच देशसेवेचे कार्य सेवा विवेक ग्रामविकास केंद्र करत आहे. याच माध्यमातून शेकडो बांबूसेवक कार्यरत झाले.

आमदार राजेंद्र गावित म्हणाले, ज्या समाजात वावरतो त्या समाजात दुर्लक्षित घटकाला आपण काही देणे लागतो, ही भावना सेवा विवेक ग्रामविकास केंद्राने जोपासली आहे. जगाच्या पाठीवर सर्वात कष्टाळू, शोषित, मेहनती, इमानदार असा हा आदिवासी समाज आहे. आदिवासी समाजाला साधने, सन्मान सेवा विवेक ने दिली. अपेक्षित घटकाला महिलांना चरितर्थ सोबत आर्थिक सुबत्ता देण्याचे काम विवेकने केले. हा समाज वीट भट्टीवर काम करत होता. विवेक पंडित यांचे समाजासाठी मोठे योगदान आहे. मी मंत्री असताना स्थलांतर थांबवायचे असेल तर समजला मोगरा लागवड, विहिरी दिल्या, बी बियाणे दिले होते. जिल्ह्यात या समाजाने मोठ्या प्रमाणात मोगरा लागवड व हळद लागवड केली होती. त्याचा आनंद वाटतो. या ठिकाणी आदिवासींकडे जमिनी आहेत. परंतु येथे भूमाफिया यांच्यापासून जमिनीचे संरक्षण केले पाहिजे, यासाठी आपण एकत्र आले पाहिजे. आपण सर्व मिळून काम करूया जमिनी विकून आदिवासी समाज देशोधडीला लागणार ही भीती वाटते. प्रकल्प आले पाहिजेत, परंतु विनाश होता कामा नये. यासाठी संघर्ष केला नाही तर समाज देशोधडीला लागेल कोणीही येतो, त्यांच्या जमिनीवर कंपाऊंड घालतो असे होता कामा नये.

रमेश पतंगे म्हणाले, शिक्षण जरी नसले तरी या आदिवासी महिलांनी बांबू कलेतून स्वतःच्या उद्धार स्वतः करून घेतला पाहिजे. आपले प्रश्न आपण स्वतः सोडवायचे हे शिकले पाहिजे. आत्मनिर्भरता हे अद्वितीय काम आहे. शासन आपले प्राथमिक कर्तव्य करत राहणार, परंतु त्यांना मर्यादा आहेत. हे कार्य आपल्या स्वतःला आणि विविध प्रकारच्या संस्थांना करावे लागेल. सेवा विवेक ग्रामविकास केंद्र आपले कर्तव्य पार पाडत आहे याचा आनंद वाटतो. आपणच पुढाकार घेतला पाहिजे ज्या घरात फूट आहे ते घर टिकू शकत नाही. हे समजून घेतले पाहिजे. समरसता निर्माण झाला पाहिजे. दुसऱ्याच्या सुख दुःखाशी समरस झालो पाहिजे. भेदभाव करू नये, या समाजाला अवलंबित करू नका तर त्यांना सक्षम करा. भाषण ऐकून परिवर्तन होणार नाही. त्यासाठी आदर्श उभा करून त्याचा विस्तार वाढवावा लागतो, हे विसरता कामा नये असे ते म्हणाले.

विवेक पंडित म्हणाले, तीस वर्षे साप्ताहिक विवेक चे संपादक पद्मश्री पतंगे हे होते. तालुक्यातील दहिसर गावातून आम्ही सेवेचे कार्य सुरू केले. नंतर संघटना स्थापून संघर्षाचे कार्य सुरू केले. सेवा आणि संघर्ष हा एक संगम आहे असे मी मानतो. सेवा विवेक ग्रामविकास केंद्राने विचार पोहोचवायचे काम विद्यापीठांपर्यंत नेले. महिला आत्मनिर्भर झाल्या. बांबू उत्पादने बनवणाऱ्या सेवा विवेकच्या शेकडो हून अधिक महिला, शेकडोहून अधिक विक्री करणारे बांबूसेवक सेवा विवेक ग्रामविकास केंद्राने तयार केले. या विक्रीतून मिळणारे पैसे पैशांवर सरकार जीएसटी घेते हे योग्य नाही, याचा विचार व्हावा. आजही ठाण्यात फ्लायओवरच्या खाली 200 कुटुंब जीवनकंठत आहेत. आजही यांची अवस्था अशी आहे. सरकारला विनंती आहे, शिक्षण हे पायाभूत व्यवस्थेकडे दुर्लक्ष करू नये. दहा हजार मुलांना शिकवायला सरकारकडे पैसे नाहीत. देशाच्या स्वातंत्र्याला 80 वर्षे होतील तेव्हा कोणीही ज्याचा त्याला आपला हक्क मिळावा, हा देश सुजलाम सुफलाम व्हावा अशी अपेक्षा आहे.

दरम्यान निर्मला दांडेकर यांनी याबाबत बोलताना धुकटन, दांडेकर येथे गेली दहा वर्षापासून सेवा विवेक मध्ये काम करत आहे. मी कला शाखेतून पदवी घेतलेली आहे. घरातल्या शिकलेल्या मुलींना कंपनीत कामाला कुणी पाठवत नव्हते. तेव्हा सेवा विवेक चे शिबिर गावात लागले होते. गावातील महिला तेव्हा सेवा विवेकचे काम करत होत्या. बोट येथे प्रशिक्षण घेतलं. बांबूपासून राखी, कंदील आणि इतर वस्तूंचे 40 दिवस प्रशिक्षण घेतले. तीन वर्षे काम केलं. लग्नाला चार वर्षे झाली. सेवा विवेक मुळे माझे आयुष्य बदलले. सन 2022 मध्ये सेवा विवेकने सन 20 22 मध्ये सेवा विवेकने प्रशिक्षक व विकास अधिकारी म्हणून माझी निवड केली. सरकारी घरकुल मिळाले परंतु पैसे कमी पडत असल्याने आम्ही पती-पत्नी दोघांनी हातभार लावला त्यामुळे मोठे घर बांधता आले हे सर्व फक्त सेवा विवेकने दिलेले प्रशिक्षण व साथ यामुळेच शक्य झाले असल्याची मत निर्मला दांडेकर यांनी व्यक्त केले.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!