banner 728x90

ग्रामीण शिक्षणाचा भगीरथ: ‘शिक्षण महर्षी’ वागेश कदम यांच्या ७० व्या वर्षातील समृद्ध वाटचाल

banner 468x60

Share This:

पालघर-योगेश चांदेकर

पालघर– शिक्षणाची गंगा केवळ शहरांच्या भिंतींपुरती मर्यादित न राहता ती ग्रामीण भागातील शेवटच्या घटकांपर्यंत, गोरगरीब विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे, हा विचार प्रत्यक्ष कृतीत उतरवणारे नेतृत्व म्हणजे जीवन विकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष वागेश कदम आज त्यांच्या वयाची ७० वर्षे पूर्ण होत असताना, त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात निर्माण केलेल्या उत्तुंग कार्याचा पट डोळ्यांसमोर उभा राहतो. पालघरसारख्या दुर्गम आणि ग्रामीण भागात शिक्षणाची दारे उघडून हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणारे वागेश कदम हे खऱ्या अर्थाने ‘शिक्षण महर्षींचा’ वारसा अविरत पुढे चालवणारे दीपस्तंभ आहेत.

banner 325x300

ग्रामीण भागातील शैक्षणिक क्रांतीचे प्रणेते
ग्रामीण भागातील मुलांमध्ये गुणवत्ता आणि बुद्धिमत्ता ठासून भरलेली असते, गरज असते ती केवळ त्यांना योग्य संधी आणि व्यासपीठ मिळवून देण्याची. हीच गोष्ट ओळखत वागेश कदम यांनी जीवन विकास शिक्षण संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागात शाळांचे जाळे विणले. केवळ पारंपरिक शिक्षण पद्धतीवर भर न देता, पालघरसारख्या भागात ‘सीबीएसई’ (CBSE) बोर्डाची शाळा सुरू करण्याचे धाडस त्यांनी दाखवले. इंग्रजी माध्यम आणि आधुनिक शिक्षण ही केवळ शहरातील श्रीमंतांची मक्तेदारी नसून ग्रामीण भागातील गोरगरीब शेतकऱ्यांच्या, कामगारांच्या मुलांचाही त्यावर तितकाच अधिकार आहे, हा विश्वास त्यांनी आपल्या कार्यातून प्रत्यक्षात आणला.

गोरगरीब विद्यार्थ्यांच्या भविष्याचा ध्यास
वागेश कदम यांच्या संपूर्ण प्रवासाच्या केंद्रस्थानी नेहमीच विद्यार्थी राहिला आहे. आर्थिक अडचणींमुळे कोणत्याही विद्यार्थ्याचे शिक्षण अधुरे राहू नये, यासाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला. विध्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास तशेच त्यांना केवळ पुस्तकी ज्ञान नाही, तर संस्कार, क्रीडा, आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन विद्यार्थ्यांना सक्षम बनवण्याचा ध्यास त्यांनी बाळगला. आज जीवन विकास शिक्षण संस्थेतून शिकून बाहेर पडलेले शेकडो विद्यार्थी विविध क्षेत्रांत यश संपादन करत विविध क्षेत्रात उच्चपदावर कार्यरत आहेत. या प्रत्येक विद्यार्थ्याच्या यशामागे वागेश कदम यांचे मार्गदर्शन आणि दृष्टी दडलेली आहे.
वयाची सात दशके पूर्ण करतानाही, शिक्षणाचा हा यज्ञ अधिक तेजोमय कसा होईल, याच ध्यासाने कार्यरत असणारे वागेश कदम म्हणजे सातत्य, निष्ठा आणि समाजसेवेचे मूर्तिमंत उदाहरण आहेत. त्यांनी लावलेल्या या शैक्षणिक रोपट्याचा आज एक मोठा वटवृक्ष झाला असून, त्याची सावली हजारो विद्यार्थ्यांना जीवन समृद्ध करण्यासाठी लाभत आहे. ज्ञानदानाचा हा पवित्र वारसा असाच अविरत पुढे नेण्यासाठी, तसेच समाजकार्याच्या या वाटेवर नवनवीन शिखरे पादाक्रांत करण्यासाठी वागेश कदम यांना निरोगी, उदंड आणि उज्वल आयुष्याच्या हार्दिक शुभेच्छा!

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!