banner 728x90

पालघर बाजार समितीच्या बळकटीकरणासाठी प्रयत्न करणार आमदार विलास तरे

banner 468x60

Share This:

पालघर-योगेश चांदेकर

नवीन कार्यालयाचे उद्घाटन; व्यापार संकुल, कोल्ड स्टोरेजसह विविध प्रकल्पांसाठी पुढाकार

banner 325x300

पालघर– पालघर कृषी उत्पन्न बाजार समिती अधिक सक्षम करण्याबरोबरच शेतकरी आणि व्यापाऱ्यांना आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही बोईसरचे आमदार विलास तरे यांनी दिली.

पालघर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवीन कार्यालयाचा उद्घाटन सोहळा मौजे. नंडोरे येथे माजी राज्यमंत्री, खासदार तथा विद्यमान आमदार राजेंद्र गावित आणि शिवसेना बोईसर विधानसभा आमदार विलास तरे यांच्या हस्ते पार पडला. याप्रसंगी सहाय्यक निबंधक विनय शिंदे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हक्काची आणि सक्षम बाजारपेठ उपलब्ध होण्याच्या दृष्टीने बाजार समितीच्या माध्यमातून आवश्यक सुविधा निर्माण करण्यावर भर दिला जाणार आहे. विशेषतः व्यापार संकुल, कोल्ड स्टोरेज, मंगल कार्यालय तसेच खरेदी-विक्री केंद्र उभारण्यासाठी आवश्यक पाठपुरावा केला जाईल. बाजार समितीच्या विकासासाठी शासनस्तरावरही प्रयत्न करण्याची भूमिका आमदार राजेंद्र गावित आणि आमदार विलास तरे यांनी यावेळी मांडली.

नवीन सुविधा उपलब्ध झाल्यानंतर शेतमालाची साठवणूक, खरेदी-विक्री आणि व्यापारी व्यवहारांना अधिक चालना मिळण्यास मदत होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

उद्घाटन सोहळ्यास बाजार समितीचे सभापती राजेंद्र पाटील, उपसभापती उत्तम पाटील, माजी सभापती तथा सेवा सहकारी संस्थांचे संचालक अनिल गावड, नागेश पाटील, सुरेश पाटील, सुहास संखे, भूषण पावडे, वनिता पाटील, अंकुश जाबर, हेमंत संखे, पुंडलिक पाटील, दुर्जला सोगले, जयेश मोरे, पंकज शहा, हिंमतलाल जैन, अंकुश घरत यांच्यासह बाजार समितीचे पदाधिकारी, संचालक व मान्यवर उपस्थित होते.

कोट
पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव आणि व्यापक बाजारपेठ मिळवून देण्यात कृषी उत्पन्न बाजार समितीची भूमिका महत्त्वाची आहे. त्यादृष्टीने बाजार समिती अधिक सक्षम व सुविधायुक्त करून शेतकऱ्यांना देशांतर्गत तसेच जागतिक बाजारपेठेशी जोडण्यासाठी प्रयत्न केले जातील – आमदार विलास तरे

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!