भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) आगामी पतधोरणात अपेक्षेपेक्षा अधिक व्याजदर वाढवू शकते, असा अंदाज परदेशी ब्रोकरेज कंपनी नोमुराने व्यक्त केला आहे. नोमुराच्या मते, डिसेंबरपर्यंत रेपो दरात एकूण ५० आधारभूत अंकांची वाढ होऊ शकते.
त्यामुळे गृहकर्ज आणि वाहनकर्जाच्या व्याजदरावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
आरबीआयच्या पतधोरण समितीची (एमपीसी) बैठक ५ ऑक्टोबरपासून सुरू होणार असून, ७ ऑक्टोबरला निर्णय जाहीर केला जाणार आहे. आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा सकाळी १० वाजता पतधोरणाची घोषणा करतील.
नोमुराच्या अंदाजानुसार, ऑक्टोबरमध्ये रेपो दरात २५ आधारभूत अंकांची, तर डिसेंबरमध्ये आणखी २५ आधारभूत अंकांची वाढ होऊ शकते. त्यामुळे रेपो दर ५.७५ टक्क्यांवर जाण्याची शक्यता आहे. महागाई नियंत्रणात ठेवणे हा या संभाव्य दरवाढीमागील प्रमुख उद्देश असल्याचे नोमुराचे म्हणणे आहे.
अन्नपदार्थ आणि ऊर्जेच्या किमती वाढल्यामुळे आगामी काळात महागाईचा दबाव वाढू शकतो. तसेच कच्च्या तेलाच्या किमतीतील वाढीचाही महागाईवर परिणाम होऊ शकतो. नोमुराने आर्थिक वर्ष २०२६-२७ मधील सरासरी किरकोळ महागाई ५.२ टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. आर्थिक वर्ष २०२७-२८ मध्ये ती आरबीआयच्या ४ टक्क्यांच्या लक्ष्यापर्यंत येऊ शकते, असेही म्हटले आहे.


















zzlWzi8qqy8Un4Ec/s320/1001506655.jpg