banner 728x90

महानायक हरपला, दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांचे निधन; वयाच्या 98 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

banner 468x60

Share This:

मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते मोहमद युसूफ खान उर्फ दिलीपकुमार यांचं निधन झालं आहे. ते 98 वर्षांचे होते. दिलीप कुमार यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने, त्यांना मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान आज पहाटे यांचा मृत्यू झाला.

दिलीप कुमार यांना काही दिवसांपासून श्वास घेण्यास अडचण येत असल्या, ने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले जाते. रुग्णालयात दाखल केल्यापासून त्यांचे चाहते आणि संपूर्ण बॉलिवूड त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत होते. पण, आज पहाटे उपचार सुरू असताना दिलीप कुमार यांनी अखेरचा श्वास घेतला. दिलीप कुमार यांच्या निधनामुळे बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.
दिलीप कुमार यांनी 1944 मध्ये आलेल्या ‘ज्वार भाटा’ या चित्रपटातून आपल्या अभिनयास सुरुवात केली होती. मात्र हा चित्रपट अपयशी ठरला होता. त्यानंतर आलेला ‘मिलन’ हा त्यांचा चित्रपट सुपरहिट ठरला होता. आणि त्यानंतर त्यांनी कधीचं मागे वळून पहिलं नाही. त्यांना बॉलिवूडमधील ‘ट्रॅजेडी किंग’ म्हणून ओळखलं जात असे.
आज भारतीय सिनेसृष्टीतील अनेक नामांकित कलाकार त्यांना आपला आदर्श मानतात. अनेक कलाकारांनी तर त्यांची नक्कल करुन बॉलिवूडमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती. इतका लोकप्रिय असलेला हा अभिनेत्याने वयाच्या 98 व्या वर्षापर्यंत आजाराशी लढा दिला. दिलीप कुमार यांचे भाऊ असलम आणि एहसान खान यांचे गेल्या वर्षी कोरोनामुळे निधन झाले होते.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!