मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते मोहमद युसूफ खान उर्फ दिलीपकुमार यांचं निधन झालं आहे. ते 98 वर्षांचे होते. दिलीप कुमार यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने, त्यांना मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान आज पहाटे यांचा मृत्यू झाला.
Home
पालघर
महानायक हरपला, दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांचे निधन; वयाच्या 98 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
महानायक हरपला, दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांचे निधन; वयाच्या 98 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
दिलीप कुमार यांना काही दिवसांपासून श्वास घेण्यास अडचण येत असल्या, ने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले जाते. रुग्णालयात दाखल केल्यापासून त्यांचे चाहते आणि संपूर्ण बॉलिवूड त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत होते. पण, आज पहाटे उपचार सुरू असताना दिलीप कुमार यांनी अखेरचा श्वास घेतला. दिलीप कुमार यांच्या निधनामुळे बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.
दिलीप कुमार यांनी 1944 मध्ये आलेल्या ‘ज्वार भाटा’ या चित्रपटातून आपल्या अभिनयास सुरुवात केली होती. मात्र हा चित्रपट अपयशी ठरला होता. त्यानंतर आलेला ‘मिलन’ हा त्यांचा चित्रपट सुपरहिट ठरला होता. आणि त्यानंतर त्यांनी कधीचं मागे वळून पहिलं नाही. त्यांना बॉलिवूडमधील ‘ट्रॅजेडी किंग’ म्हणून ओळखलं जात असे.
आज भारतीय सिनेसृष्टीतील अनेक नामांकित कलाकार त्यांना आपला आदर्श मानतात. अनेक कलाकारांनी तर त्यांची नक्कल करुन बॉलिवूडमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती. इतका लोकप्रिय असलेला हा अभिनेत्याने वयाच्या 98 व्या वर्षापर्यंत आजाराशी लढा दिला. दिलीप कुमार यांचे भाऊ असलम आणि एहसान खान यांचे गेल्या वर्षी कोरोनामुळे निधन झाले होते.
Recommendation for You

Post Views : 101 पालघर आगारात प्रवाशांच्या सेवेत पाच नवीन ‘राजमाता जिजाऊ’ बसगाड्यांचा समावेश करण्यात…

पालघर-योगेश चांदेकर पालघर: जव्हार तालुक्यातील धारणहट्टी गावातील दोन आदिवासी अल्पवयीन मुलांना बालकामगार म्हणून वाडा तालुक्यातील…

Post Views : 101 शासनाने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत…

Post Views : 101 पालघर-योगेश चांदेकर पालघर- आधुनिक पालघरच्या निर्मितीत आणि विकासाच्या प्रक्रियेत राजेंद्र गावित…

पालघर-योगेश चांदेकर पालघर: राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने पालघर जिल्ह्यात मोठी कारवाई करत बनावट…












zzlWzi8qqy8Un4Ec/s320/1001506655.jpg