banner 728x90

2019 मध्ये कर्जमाफी मिळालेल्या शेतकर्‍यांसाठी आनंदवार्ता! आता कोणता मिळणार फायदा?

banner 468x60

Share This:

2019 मध्ये उद्धव ठाकरे सरकारने महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजना राबवली होती. नवीन कर्जमाफी योजनेत या शेतकर्‍यांना लाभ मिळणार नाही असा आरोप करण्यात येत होता.

पण आता नवीन आलेल्या माहितीनुसार, ठाकरे सरकारच्या काळात कर्जमुक्ती मिळालेल्या शेतकऱ्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्ममाफी योजेनेतंर्गत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिगटाची एक उपसमिती गठीत करण्यात आली आहे. या मंत्रिगटाच्या उपसमितीत याविषयीची चर्चा झाल्याचे समजते. जुन्या लाभार्थ्यांना किती प्रोत्साहनपर लाभ देण्यात येईल. त्यांना अजून काय फायदा होईल याविषयीची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लवकरच जाहीर करणार आहेत, अशी माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बुधवारी विधानसभेत दिली.

शेतकऱ्यांचे थकीत 2 लाख सरकार भरणार

राज्यात यापूर्वी 2017 मध्ये 1.5 लाख रुपये, 2019 मध्ये दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी देण्यात आली होती. नव्या योजनेतंर्गत दोन लाख रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांसाठी वन टाईम सेटलमेंटची तरतूद करण्यात आली आहे. थकीत कर्जातील दोन लाख रुपये सरकार भरणार आहेत. तर उर्वरीत रक्कम शेतकऱ्यांनी भरायची आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे खाते नियमित होईल आणि त्यांना पुन्हा कर्ज मिळण्याची सोय होईल.

महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेतील 12.71 लाख शेतकऱ्यांना नवीन कर्जमाफी योजनाचा लाभ मिळण्याचा अंदाज आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील उपसमितीत याबाबत चर्चा झाल्याचे समजते. त्याविषयीचा निर्णय मुख्यमंत्री लवकरच जाहीर करतील, अशी माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत दिली.

उष्माघाताने मृत्युमुखी पडलेल्या शेतकर्‍यांनाही फायदा?

उष्माघाताने मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांना गोपीनाथ मुंडे सानुग्रह अनुदान देण्याचा प्रस्ताव ही सरकारच्या विचाराधीन असल्याचे कृषीमंत्री दत्ता भरणे यांनी सांगितले. वन टाईम सेटलमेंटचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना 31 मार्च 2027 रोजीपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. व्यापारी बँकांनाही या प्रक्रियेत आवश्यक सलवती देण्यात येणार असल्याची माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली. पण विरोधी पक्षाने संपूर्ण कर्जमाफीची मागणी करत सभात्याग केला.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!