नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याविरोधात देशातील शेतकरी गेल्या 6 महिन्यांपासून दिल्लीच्या विविध सीमांवर आंदोलन करत आहे. केंद्र सरकार आणि शेतकरी नेत्यांमध्ये अनेकदा यासंदर्भात बैठकी झाल्या मात्र त्यात कोणताही तोडगा निघाला नाही. जो पर्यंत सरकार हे कायदे मागे घेत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करणार अशी शेतकऱ्यांची भूमिका आहे. मात्र देशात कोरोनाची दुसरी लाट आल्यामुळे शेतकरी आंदोलनावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला होता.
Farmers Protest : देशभरातील राजभवनांना शेतकरी घेराव घालणार, टिकैत यांची घोषणा
परंतु आता ही लाट ओसरल्याने आता शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी पुन्हा एकदा कंबर कसली आहे. देशातील प्रत्येक राजभवनावर शेतकरी घेराव घालणार अशी घोषणा राकेश टिकैत यांनी दिली आहे. 26 जून रोजी देशभरात ‘लोकशाही वाचवा, शेतकरी वाचवा’ हा दिवस साजरा करणार आहे. शेतकरी आंदोलनाला सात महिने होत आले असून, सरकारने त्यात कोणत्याही प्रकारे तोडगा काढला नाही त्यामुळे आता राष्ट्रपतींनी या प्रकरणात लक्ष घालावे अशी भूमिका टिकैत यांनी मांडली आहे.
Recommendation for You

Post Views : 303 पालघर-योगेश चांदेकर पालघरः पालघर जिल्ह्याच्या शेजारी असलेल्या दीव दमण या केंद्रशासित…

Post Views : 303 जव्हार:दिनांक 11 फेब्रुवारी आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळांमध्ये गेल्या २० वर्षांपासून धुलाई…

Post Views : 303 पालघर-योगेश चांदेकररेल्वेच्या महाव्यवस्थापकांना पत्रसामाजिक कार्यकर्त्याच्या मागणीची दखल पालघरः पालघर शहराचे पश्चिम…













