नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याविरोधात देशातील शेतकरी गेल्या 6 महिन्यांपासून दिल्लीच्या विविध सीमांवर आंदोलन करत आहे. केंद्र सरकार आणि शेतकरी नेत्यांमध्ये अनेकदा यासंदर्भात बैठकी झाल्या मात्र त्यात कोणताही तोडगा निघाला नाही. जो पर्यंत सरकार हे कायदे मागे घेत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करणार अशी शेतकऱ्यांची भूमिका आहे. मात्र देशात कोरोनाची दुसरी लाट आल्यामुळे शेतकरी आंदोलनावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला होता.
Farmers Protest : देशभरातील राजभवनांना शेतकरी घेराव घालणार, टिकैत यांची घोषणा
परंतु आता ही लाट ओसरल्याने आता शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी पुन्हा एकदा कंबर कसली आहे. देशातील प्रत्येक राजभवनावर शेतकरी घेराव घालणार अशी घोषणा राकेश टिकैत यांनी दिली आहे. 26 जून रोजी देशभरात ‘लोकशाही वाचवा, शेतकरी वाचवा’ हा दिवस साजरा करणार आहे. शेतकरी आंदोलनाला सात महिने होत आले असून, सरकारने त्यात कोणत्याही प्रकारे तोडगा काढला नाही त्यामुळे आता राष्ट्रपतींनी या प्रकरणात लक्ष घालावे अशी भूमिका टिकैत यांनी मांडली आहे.
Recommendation for You

पालघर-योगेश चांदेकर पालघर: जव्हार तालुक्यातील धारणहट्टी गावातील दोन आदिवासी अल्पवयीन मुलांना बालकामगार म्हणून वाडा तालुक्यातील…

Post Views : 344 शासनाने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत…

Post Views : 344 पालघर-योगेश चांदेकर पालघर- आधुनिक पालघरच्या निर्मितीत आणि विकासाच्या प्रक्रियेत राजेंद्र गावित…

पालघर-योगेश चांदेकर पालघर: राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने पालघर जिल्ह्यात मोठी कारवाई करत बनावट…

Post Views : 344 पालघर-योगेश चांदेकर पालघर- भारताच्या समकालीन शेतकरी आणि कामगार चळवळीचा इतिहास जेव्हा…












zzlWzi8qqy8Un4Ec/s320/1001506655.jpg