banner 728x90

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरील घाटाची कोंडी फुटणार; ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे १ मेला लोकार्पण

banner 468x60

Share This:

मुंबई -पुणे द्रुतगती मार्गावरील प्रवास अधिक वेगवान आणि सुरक्षित करण्यासाठी उभारण्यात आलेल्या महत्त्वाकांक्षी ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे काम ९९ टक्के पूर्ण झाले असून, १ मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते याचे उद्घाटन होणार आहे.

या प्रकल्पामुळे बोरघाटातील वाहतूक कोंडीतून प्रवाशांची कायमची सुटका होणार असून प्रवास सिग्नल-फ्री होणार असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी नुकतीच या प्रकल्पस्थळी भेट देऊन कामाची पाहणी केली. हा प्रकल्प पूर्णतः ‘ॲक्सेस कंट्रोल’ असून यामुळे प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणावर वाचणार आहे. सुमारे १०.५ किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पात दोन मोठे बोगदे आणि टायगर व्हॅलीवर १८२ मीटर उंचीचा भव्य केबल-स्टेड पूल बांधण्यात आला आहे. विशेष म्हणजे, यातील बोगदा सुमारे २३.७५ मीटर रुंद असून तो जगातील सर्वात रुंद बोगद्यांपैकी एक ठरला आहे.

लोणावळा तलावाच्या १८२ मीटर खालून जाणारा हा रस्ता तयार करणे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळासाठी (MSRDC) मोठे तांत्रिक आव्हान होते. प्रतिकूल हवामान आणि कठीण भौगोलिक परिस्थितीवर मात करून हा प्रकल्प आता पूर्णत्वाकडे आहे. या प्रकल्पामुळे मुंबई आणि पुणे ही दोन शहरे अधिक जवळ येणार असून राज्याच्या अर्थव्यवस्थेलाही गती मिळणार आहे.

banner 325x300

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!