banner 728x90

महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईचा भडका, सिलिंडरच्या किंमतीत वाढ, काय आहेत नवे दर

banner 468x60

Share This:

सर्वसामान्य जनता आधीच पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीच्या वाढत्या दरांमुळे त्रस्त असताना, आता महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईचा आणखी एक मोठा झटका बसला. तेल कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरच्या दरांमध्ये वाढ करण्याची घोषणा केली.

जून महिन्याच्या पहिल्याच दिवशी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत तब्बल ४२ रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. या दरवाढीमुळे आता व्यावसायिक वापरकर्त्यांना अधिक खिसा रिकामा करावा लागणार आहे.

किती रुपयांनी महाग झाला सिलिंडर?

यासोबतच, ५ किलोग्रॅमच्या फ्री ट्रेड एलपीजी सिलिंडरच्या किमतीतही ११ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. दिल्लीमध्ये आता या ५ किलोच्या सिलिंडरची किंमत ८२१.५० रुपये झाली आहे. देशांतर्गत बाजारपेठेत सातत्याने वाढणाऱ्या या किमतींमुळे व्यावसायिक क्षेत्रातील चिंतेत भर पडली आहे.

तेल कंपन्यांनी मध्यरात्री घेतली मोठा निर्णय

तेल कंपन्यांनी जाहीर केलेल्या नवीन दरांनुसार, राजधानी दिल्लीत १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरचा दर आता वाढून ३,११३.५० रुपये प्रति सिलिंडर झाला आहे. कोलकातामध्ये याच १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत आता ३,२५५.५० रुपये प्रति सिलिंडरवर पोहोचली आहे. या संपूर्ण दरवाढीत सर्वसामान्य कुटुंबांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. घरगुती वापरासाठी असलेल्या १४.२ किलोग्रॅमच्या एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे गृहिणींचे बजेट सध्या तरी कोलमडण्यापासून वाचले आहे.

छोट्या व्यावसायिकांचं बजेट कोलमडणार

व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती वाढल्यामुळे याचा थेट फटका हॉटेल व्यावसायिक, ढाबे, रेस्तरां, तसेच लग्न आणि पार्ट्यांमध्ये केटरिंग सेवा देणाऱ्या ऑपरेटरना बसणार आहे. खाद्यपदार्थांच्या व्यवसायाशी जोडलेल्या इतर लहान-मोठ्या उद्योजकांचे बजेट यामुळे पूर्णपणे कोलमडणार आहे.

जेव्हा जेव्हा व्यावसायिक सिलिंडर महाग होतो, तेव्हा हॉटेल चालक आपला वाढलेला खर्च भरून काढण्यासाठी खाद्यपदार्थांचे दर वाढवतात. त्यामुळे येत्या काळात हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये बाहेर जेवायला जाणे सर्वसामान्यांसाठी अधिक महाग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

1 मे रोजी वाढले होते व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर

यापूर्वी, १ मे रोजी देखील १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत मोठी वाढ करण्यात आली होती. त्यावेळी तेल कंपन्यांनी थेट ९९३ रुपयांची प्रचंड वाढ केली होती. त्या ऐतिहासिक वाढीमुळे दिल्लीत व्यावसायिक सिलिंडरचा दर २,०७८.५० रुपयांवरून थेट ३,०७१.५० रुपयांवर गेला होता. तसेच ५ किलोच्या ‘छोटू’ सिलिंडरचा दरही २६१ रुपयांनी वाढवण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर आता पुन्हा झालेली ४२ रुपयांची वाढ व्यावसायिकांचे कंबरडे मोडणारी ठरणार आहे.

निर्यातीवरही लागणार एक्स्पोर्ट ड्युटी

केंद्र सरकारने रविवारी एक महत्त्वाचा निर्णय घेत पेट्रोल, डिझेल आणि विमानांच्या इंधनावरील एक्स्पोर्ट ड्युटी कमी करण्याची घोषणा केली आहे. हे नवीन दर आजपासून लागू झाले आहेत. पेट्रोलच्या निर्यातीवर १.५ रुपये प्रति लीटर तर डिझेलच्या निर्यातीवर १३.५ रुपये प्रति लीटर दर लावण्यात आले आहेत. विमान इंधनाच्या निर्यातीवर ९.५ रुपये प्रति लीटर निश्चित केली आहे. या सगळ्याचा परिणाम म्हणजे हॉटेल जेवण, यासोबत खाद्यपदार्थांचे दर आणखी महाग होण्याची चिन्हं आहेत.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!