सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी स्पष्ट केले की, देशभरात फटाक्यांवर पूर्ण बंदी घालण्याचा विचार नाही. दिवाळी हा सण लोकांच्या भावना आणि परंपरांशी जोडलेला असल्याने त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करता येणार नाही, असे न्यायालयाने नमूद केले.
मात्र, दिवसभर किंवा २४ तास फटाके फोडण्याची परवानगी देता येणार नाही, असेही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. सतत फटाके फोडल्यामुळे आजारी व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना त्रास होण्याची शक्यता असल्याचे न्यायालयाने म्हटले.
फटाक्यांचे प्रकार तसेच ते फोडण्यासाठी निश्चित करण्यात येणाऱ्या वेळांबाबत विचार केला जाणार असल्याचे न्यायालयाने सांगितले. दिवाळीचा उत्साह कायम ठेवताना नागरिकांच्या आरोग्याचीही काळजी घेत उत्सव आणि आरोग्य यांच्यात संतुलन साधण्याचा प्रयत्न न्यायालय करणार आहे.
प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात १५ ऑक्टोबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे. त्यामुळे आगामी दिवाळीत फटाके फोडण्याच्या वेळा आणि फटाक्यांच्या प्रकारांबाबत न्यायालयाकडून काय निर्देश दिले जातात, याकडे लक्ष लागले आहे.


















zzlWzi8qqy8Un4Ec/s320/1001506655.jpg