Breaking News
मनोज जरांगे यांच्या आंदोलनानंतर सरकारी पातळीवर महत्त्वाच्या हालचाली, चार महत्त्वाचे शासकीय आदेश काढले, मराठा समाजाला काय फायदा मिळणार? Driving Licence New Rules : तर थेट ड्रायव्हिंग लायसन्स रद्द होणार, नितीन गडकरींची मोठी घोषणा, नवी पॉइंट सिस्टीम आहे तरी काय? मनोज जरांगेंच्या आंदोलनाला मोठं यश! विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीबाबत सरकारकडून महत्त्वाचा निर्णय जाहीर वेदमूर्ती गजानन नामजोशी यांचे निधन वेदविद्या, पौरोहित्य आणि संस्कृत परंपरेच्या जतनासाठी आयुष्यभर कार्य त्यांच्या मार्गदर्शनातून पाचशेहून अधिक विद्यार्थ्यांचे वेदाध्ययन …. तर ‘या’ महिलांचा अर्ध्या तिकिटाचा प्रवास बंद ? आजपासून लागू झालेला नवा नियम कोणता ?
banner 728x90

ठाण्यात 665 बेकायदा होर्डिंग हटवले, पालिकेच्या अतिक्रमण विभागाची कारवाई

banner 468x60

Share This:

शहरातील रस्त्याच्या दुभाजकांवर, पादचारी मार्गावर तसेच झाडांवर लावण्यात आलेल्या 665 बेकायदा होर्डिंग पालिकेने हटवले आहेत. पालिकेच्या वतीने पोस्टर्स, बॅनर्स आणि बेकायदेशीर फलक हटवण्याची विशेष मोहीम आज राबवण्यात आली.

आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार एकाच दिवशी बेकायदा पोस्टर्स, बॅनर्सवर कारवाई करण्यात आली.

banner 325x300

ठाणे पालिकेचा अतिक्रमण विभाग व प्रभाग समितीतील कर्मचारी यांच्यामार्फत ही कारवाई करण्यात आली. शहरातील पोस्टर्स, होर्डिंग्जमुळे शहराचे विद्रुपीकरण होत असून अनेकदा वाऱ्यामुळे अशा प्रकारचे होर्डिंग्ज पडून दुर्घटना होण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व बेकायदा होर्डिंग्ज आयुक्तांच्या निर्देशानुसार हटवण्यात येत असून ही मोहीम यापुढेही सातत्याने सुरू राहील असे राव यांनी सांगितले. विजेच्या खांबावर, झाडांवर, रस्त्याच्या दुभाजकांवर, रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेले धोकादायक बॅनर्स, फलक काढण्यात आले आहेत. या कारवाई दरम्यान अतिक्रमण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे, सर्व प्रभाग समित्यांचे सहाय्यक आयुक्त तसेच प्रभाग समितीतील अतिक्रमण विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!