औरंगाबाद : सलमान शेख – गेल्या अनेक दिवसांपासून दांडी मारलेल्या पावसाने औरंगाबाद जिल्ह्यासह मराठवाड्यातही हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात सुरुवातीला पाऊस झाला त्यात बऱ्याच जणांनी पिकांची लागवड केली होती. मात्र पावसाने उघडीप दिल्याने जिल्ह्यातील अनेक भागात पीक वाळत चालली होती. त्यामुळे शेतकरी वर्ग मोठा प्रमाणात नाराज झाला होता. मात्र आज दुपारपासूनच जिल्ह्यात सर्वदूर पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांच्या मनात आनंद निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी कापसाच्या लागवडी झाल्या नव्हत्या. मात्र आता पावसाने चांगला जोर धरल्याने उरेल-सुरेल लागवडीलाही जोर येणार आहे. आज सकाळपासूनच कडक ऊन आणि उकाड्यामुळे नागरिक त्रस्त होते. त्यात आज पावसाने चांगली हजेरी लावल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू, बळीराजा सुखावला
गंगापूर तालुक्यातही दुपारी 3 वाजेपासून पावसाची विजांच्या कडकडाटासह जोरदार बॅटिंग सुरू आहे. तालुक्यातील अगर कानडगाव, ममदापूर, बगडी, जामगाव यासह संपुर्ण तालुक्यात जोरदार सरी बरसल्या आहे.
गेल्या पंधरवड्यापासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्याच्या चिंतेत वाढ झाली होती. पैठण तालुक्यातील अनेक गावात दुबारपेरणीचे संकट निर्माण झाले होते. मात्र आता पावसाने ऐनवेळी साथ दिल्याने शेतकऱ्याच्या मनात आनंद निर्माण झाला आहे. दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी वरुणराजाने बळीराजाला साथ द्यावी हीच लक्षवेधी न्युज कडून प्रार्थना.
Recommendation for You

Post Views : 98 पालघर आगारात प्रवाशांच्या सेवेत पाच नवीन ‘राजमाता जिजाऊ’ बसगाड्यांचा समावेश करण्यात…

पालघर-योगेश चांदेकर पालघर: जव्हार तालुक्यातील धारणहट्टी गावातील दोन आदिवासी अल्पवयीन मुलांना बालकामगार म्हणून वाडा तालुक्यातील…

Post Views : 98 शासनाने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत…

Post Views : 98 पालघर-योगेश चांदेकर पालघर- आधुनिक पालघरच्या निर्मितीत आणि विकासाच्या प्रक्रियेत राजेंद्र गावित…

पालघर-योगेश चांदेकर पालघर: राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने पालघर जिल्ह्यात मोठी कारवाई करत बनावट…












zzlWzi8qqy8Un4Ec/s320/1001506655.jpg