banner 728x90

Budget 2024 : अर्थसंकल्पानंतर काय स्वस्त, काय महागलं? वाचा पूर्ण यादी

banner 468x60

Share This:

Budget 2024 Costlier and Cheaper Items : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी मोदी सरकार ३.० चा पहिला अर्थसंकल्प नुकताच सादर केला. या अर्थसंकल्पात त्यांनी अनेकविध क्षेत्रासाठी तरतूद जाही केली असून रोजगारासाठी आणि रोजगारनिर्मितीसाठीही अनेक योजना सादर केल्या आहेत.

banner 325x300

या अर्थसंकल्पानंतर देशात कोणत्या वस्तू व सेवा स्वस्त होणार? कोणत्या गोष्टी महागणार? हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात असतानाच सीतारामण यांनी अनेक वस्तू आणि सेवांवरील कररचनेत बदलाची घोषणा केली आहे. कर कमी केल्याने काही वस्तू स्वस्त झाल्या आहेत. तर काही वस्तूंसाठी आता आपल्याला अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. गेल्या वर्षी सादर केलेल्या अर्थसंकल्पानंतर टीव्ही, स्मार्टफोन, कम्प्रेस्ड गॅस व प्रयोगशाळेत तयार केले जाणारे हिरे स्वस्त झाले होते. दुसऱ्या बाजूला सिगारेटच्या किंमती वाढल्या होत्या, विमान प्रवास महागला होता. त्याचबरोबर वस्त्रोद्योगालाही फटका बसला होता. यंदाच्या अर्थसंकल्पानंतर काय स्वस्त झालं, काय महाग झालं त्याची यादी पाहूया.

अर्थमंत्री निर्मला सीतारामण म्हणाल्या, शेतकऱ्यांसाठी आम्ही सर्व प्रकारच्या पिकांची हाय मिनिमम सपोर्ट प्राईस (किमान आधारभूत किंमत किंवा हमीभाव) ठरवली आहे. यामुळे शेतकऱ्याला त्याने केलेल्या खर्चावर ५० टक्के अधिक किंमत मिळेल.

मोबाईल फोन व चार्जर्स स्वस्त होणार

अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी मोबाईल फोन व चार्जरवरील कस्टम ड्युटी (सीमाशुल्क) १५ टक्क्यांनी कमी करत असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता मोबाईल फोन व चार्जर्स स्वस्त होतील.

सोने व चांदीवरील सीमाशुल्क ६ टक्क्यांनी कमी करण्यात आलं आहे, तर प्लॅटिनमवरील सीमाशुल्कात ६.४ टक्के घट करण्यात आली आहे.

कर्करोगावरील उपचारांसाठी वापरल्या जाणाऱ्या तीन प्रमुख औषधांना सीमाशुल्कातून सूट देण्यात आली आहे.

सोलार पॅनेलची निर्मिती करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या काही वस्तूंना सीमाशुल्कातून सूट देण्याचा प्रस्तावही अर्थ्यमंत्र्यांनी यावेळी मांडला.

ई-कॉमर्सवरील टीडीएस रेट १ टक्क्यावरून ०.१ टक्क्यांपर्यंत कमी केला आहे.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!