औरंगाबाद : सलमान शेख – कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला 4 महिने पूर्ण महिने पूर्ण होत आहे. मात्र अजूनही अनेक कोरोना योद्धांना कोरोनाची लस मिळालेली नाही. जिल्ह्यातील 72 हजार 191 फ्रंटलाईन वर्कर्सपैकी फक्त 27,017 जणांना म्हणजेच 37 टक्के कोरोना योद्ध्यांनीच कोरोनाचे दोन्ही डोस घेतले आहेत. इतर 43 टक्के योद्धांनी याकडे पाठ फिरवली आहे. तसेच 45 पेक्षा अधिक वय असलेल्या 13 लाख 52 हजार नागरिकांपैकी फक्त 26 टक्के जणांनीच लसीचा पहिला डोस घेतला आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील 63 टक्के कोरोना योद्धे अजूनही लसीच्या दुसऱ्या डोसविना
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर सुरुवातीला अनेक जणांनी पहिल्या टप्प्यात लस घेतली होती. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने आणि पहिल्या आणि दुसऱ्या डोस दरम्यान 84 दिवसांचा अंतर केल्यामुळे दुसरा डोस घेणाऱ्यांना प्रतीक्षा करावी लागत आहे. औरंगाबाद शहरातील मनपा हद्दीत असणाऱ्या 37 हजार 23 फ्रंटलाईन वर्करने लसीचा पहिला डोस घेतला. मात्र, दुसरा डोस घेणाऱ्यांचे प्रमाण कमी असून 46.78 टक्के इतकाच आहे.
Recommendation for You

Post Views : 75 राज्यातील पालघर जिल्ह्यातील एका औषध (फार्मास्युटिकल) निर्मिती कारखान्यात आज सकाळी भीषण…

Post Views : 75 पालघर-योगेश चांदेकरआमदार राजेंद्र गावित यांनी मांडली होती लक्षवेधी पालघरः पालघर जिल्ह्यातील…

Post Views : 75 पालघर-योगेश चांदेकरखा. डॉ. हेमंत सवरा यांची माहितीअभियानाचा नागरिकांना फायदा होणार पालघरः…

Post Views : 75 पालघर-योगेश चांदेकर तलासरी व डहाणू तालुक्यातील जनता दरबारात तक्रारींचे जागीच निवारण…












