banner 728x90

IND vs BAN 2nd Test: दुसऱ्या कसोटीसाठी संघात एकच बदल होण्याची शक्यता, ‘ही’ असु शकते भारताची संभाव्य प्लेइंग 11

banner 468x60

Share This:


IND vs BAN 2nd Test:
भारतीय क्रिकेट संघाने (Team India) दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात बांगलादेशचा 188 धावांनी पराभव केला. भारतीय संघाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आता शेवटच्या सामन्यावर सर्वांचे लक्ष लागले आहे. टीम इंडियाला या सामन्यात मालिका विजयासह जागतिक कसोटी अजिंक्यपद गुणतालिकेत आपले स्थान आणखी मजबूत करायचे आहे. तसेत या सामन्याचा भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्माही (Rohit Sharma) बाहेर पडला आहे, अशा परिस्थितीत फक्त केएल राहुलच (KL Rahul) कर्णधार असेल. राहुल दुसऱ्या कसोटीत 11 खेळाडूसह कसा उतरतो हे पाहणे विशेष ठरणार आहे.

banner 325x300

गिल-राहुल सामन्याला देणार सलामी

ओपनिंगचा विचार केला तर रोहितच्या अनुपस्थितीत पुन्हा एकदा शुभमन गिल कर्णधार राहुलसोबत डावाची सुरुवात करेल. गिलने गेल्या सामन्यात शानदार शतक झळकावले होते. त्याचबरोबर राहुलकडून चांगल्या खेळीचीही अपेक्षा असेल. रोहित संघात नसल्यानंतरही ही जोडी चमकदार कामगिरी करत आहे.

मधली ऑर्डर अशी असेल

भारताच्या फलंदाजीच्या क्रमवारीत बदल होण्याची शक्यता फारच कमी आहे. गेल्या सामन्यात शतक झळकावणारा चेतेश्वर पुजारा तिसऱ्या क्रमांकावर उतरेल. आणि पुन्हा एकदा विराट कोहली चौथ्या क्रमांकावर दिसणार आहे. हे दोन्ही फलंदाज संघाचा कणा मानले जातात. विराट गेल्या सामन्याच्या दोन्ही डावात स्वस्तात बाद झाला, त्यामुळे त्याच्या पुनरागमनाकडेही लक्ष असेल. श्रेयस अय्यर पाचव्या क्रमांकावर येईल. हे वर्ष अय्यर यांच्यासाठी स्वप्नापेक्षा कमी नाही आणि तो हा डाव आनंदात संपवण्याचा प्रयत्न करेल. याशिवाय ऋषभ पंतचे नाव सहाव्या क्रमांकावर आहे. पंत संघाचा यष्टिरक्षकही आहे.

अश्विन-अक्षर अष्टपैलू असतील

रविचंद्रन अश्विन आणि अक्षर पटेल यांचा संघातील दोन प्रमुख अष्टपैलू खेळाडू म्हणून पुन्हा एकदा समावेश केला जाणार आहे. अश्विनने मागच्या सामन्यात गोलंदाजीत फारसे काही केले नाही, पण पहिल्या डावात त्याच्या बॅटमधून धावा आल्या. आणि अक्षर हा भारताच्या फिरकी विभागातील नवीन शक्ती म्हणून उदयास आला आहे. या खेळाडूने सामन्याच्या शेवटच्या डावात 4 बांगलादेशी खेळाडूंचे बळी घेतले. दुस-या कसोटीतही अक्षर फलंदाजीने योगदान देण्याचा प्रयत्न करेल.

गोलंदाजी क्रमवारीत होवू शकतो बदल

टीम इंडियाच्या गोलंदाजीत बदल होऊ शकतो. डावखुरा फिरकीपटू कुलदीप यादवचा संघात समावेश पुन्हा एकदा निश्चित आहे. या गोलंदाजाने गेल्या सामन्यात एकूण 8 बळी घेत अप्रतिम पुनरागमन केले. त्याच्याशिवाय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजचाही प्लेइंग 11 मध्ये समावेश असेल. मात्र उमेश यादवच्या जागी व्यवस्थापन दुसऱ्या कसोटीत जयदेव उनाडकटला संधी देऊ शकते. उनाडकट हा डावखुरा तेज गोलंदाज असून त्याने 12 वर्षांनंतर भारतीय कसोटी संघात पुनरागमन केले आहे.

दुसऱ्या कसोटीसाठी भारताची संभाव्य प्लेइंग 11:

शुभमन गिल, केएल राहुल (कर्णधार), चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!