banner 728x90

ऑगस्टचे वीजबिल पाहून उडणार झोप! महावितरणचा ग्राहकांना शॉक; प्रति युनिट ‘इतके’ पैसे वाढले

banner 468x60

Share This:

उन्हाळा संपल्यानंतर वीजबिलात काही प्रमाणात दिलासा मिळेल अशी आशा बाळगणाऱ्या राज्यातील सर्वसामान्य वीजग्राहकांना महावितरणने मोठा झटका दिला आहे. जुलै महिन्याच्या वीज वापरावर महावितरणकडून ‘इंधन समायोजन शुल्क’ (Fuel Adjustment Charge) लागू करण्यात आले आहे.

यामुळे सर्वसामान्य घरगुती ग्राहकांपासून ते व्यावसायिक, उद्योग आणि इलेक्ट्रिक वाहन धारकांपर्यंत सर्वांनाच ऑगस्ट महिन्याच्या वीजबिलात प्रति युनिट अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहेत.

यंदाच्या उन्हाळ्यात विजेची मागणी विक्रमी पातळीवर पोहोचली होती. ही वाढती मागणी भागवण्यासाठी महावितरणला महागड्या दराने वीज खरेदी करावी लागली होती. या अतिरिक्त खर्चाची भरपाई करण्यासाठी महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या (MERC) निर्देशानुसार हे इंधन समायोजन शुल्क वसूल केले जात असल्याचे स्पष्टीकरण महावितरणने दिले आहे. महावितरणच्या या निर्णयाचा भार आता ग्राहकांच्या खिशावर आला आहे. महावितरणच्या या निर्णयावर सामान्य ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

banner 325x300

>> घरगुती ग्राहकांवर किती भार?


घरगुती वीजग्राहकांना त्यांच्या वीज वापरानुसार प्रति युनिट १० पैसे ते ६० पैशांपर्यंत अतिरिक्त भार सहन करावा लागणार आहे.

> दारिद्र्यरेषेखालील ग्राहक: १० पैसे प्रति युनिट

> १०० युनिटपर्यंत वापर: २० पैसे प्रति युनिट

> १०१ ते ३०० युनिटपर्यंत: ४० पैसे प्रति युनिट

> ३०१ ते ५०० युनिटपर्यंत: ५५ पैसे प्रति युनिट

> ५०० युनिटपेक्षा जास्त: ६० पैसे प्रति युनिट
उद्योग, ई-व्हीकल आणि शेतीवरही परिणाम


या इंधन समायोजन शुल्काचा फटका केवळ घरगुती ग्राहकांनाच नव्हे तर व्यापारी आणि उद्योजकांनाही बसला आहे.

> कमी दाबाचे वाणिज्यिक (Commercial) ग्राहक: ४०, ५० ते ६० पैसे प्रति युनिट

> औद्योगिक ग्राहक: कमी दाबाच्या उद्योगांसाठी २५ ते ३५ पैसे, तर उच्चदाब उद्योगांसाठी श्रेणीनुसार ३० ते ४५ पैसे अतिरिक्त मोजावे लागतील.

> इलेक्ट्रिक वाहन (EV) चार्जिंग: ई-व्हीकल चार्जिंग स्टेशनसाठी प्रति युनिट ३० पैसे अतिरिक्त शुल्क लागू करण्यात आले आहे, ज्यामुळे ई-व्हीकल चार्जिंगही महागणार आहे.

> शेतीचा वीज वापर: शेतीसाठी प्रति युनिट १५ ते २५ पैसे इंधन शुल्क लागू केले आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या वीजबिलाचा भार राज्य सरकार उचलत असल्याने या वाढीमुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर अतिरिक्त आर्थिक ताण येणार आहे.

एप्रिल महिन्यात नवीन वीजदर लागू करताना वीज स्वस्त झाल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्षात इंधन समायोजन शुल्काची भर पडल्याने ग्राहकांच्या खिशाला मोठी कात्री लागणार आहे.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!