banner 728x90

पुण्यात 10 वर्ष ‘डॉक्टर’ बनून लोकांवर उपचार; अखेर बनावट डॉक्टरचा पर्दाफाश, बॅगेतील औषधं पाहून पोलिसही चक्रावले

banner 468x60

Share This:

पुण्यातील पुनावळे परिसरातून वैद्यकीय क्षेत्राला काळिमा फासणारी एक अत्यंत गंभीर घटना समोर आली आहे. गेली 10 वर्षे कोणताही अधिकृत वैद्यकीय परवाना किंवा पदवी नसताना एक भामटा रुग्णांच्या जीवाशी खेळत होता.

भागवत निषाद असे या बनावट डॉक्टरचे नाव असून, स्थानिक नागरिकांनी त्याला रंगेहात पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

हा बनावट डॉक्टर मुख्यत्वे पुनावळे भागातील विविध बांधकाम साईट्सवर जाऊन तेथील गरीब व गरजू कामगारांवर उपचार करत असे. गेल्या 10 वर्षांपासून त्याचा हा बेकायदेशीर धंदा विनाअडथळा सुरू होता. उपचाराच्या नावाखाली तो रुग्णांना भ्रामक माहिती देऊन त्यांची फसवणूक करत असल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे.

banner 325x300

या कारवाईदरम्यान त्याच्याकडून जप्त करण्यात आलेला औषधसाठा अत्यंत धक्कादायक आहे. केवळ तज्ज्ञ व अधिकृत डॉक्टरांच्या सल्ल्यानेच दिली जाणारी उच्च क्षमतेची औषधे तो मजुरांना देत होता. वैद्यकीय ज्ञानाशिवाय अशा औषधांचा वापर केल्यास रुग्णाचा जीव धोक्यात येऊ शकतो, याची कल्पना असतानाही तो हा जीवघेणा प्रकार करत होता.

‘मी डॉक्टर नाही, प्रॅक्टिशनर!’

स्थानिक नागरिकांना त्याच्या हालचालींवर संशय आल्यानंतर त्यांनी त्याला वैद्यकीय पदवीबाबत विचारणा केली. त्यावेळी घाबरलेल्या भागवत निषादने “मी डॉक्टर नसून फक्त प्रॅक्टिशनर आहे,” अशी कबुली दिली. कोणतीही अधिकृत परवानगी नसताना सुरू असलेला हा गंभीर प्रकार उघडकीस आल्यानंतर संतापलेल्या नागरिकांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधला.

सध्या पोलिसांनी या बनावट डॉक्टरला ताब्यात घेतले असून, त्याच्याकडे इतक्या मोठ्या प्रमाणात उच्च प्रतीची औषधे कोठून आली आणि या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा कसून तपास सुरू आहे. या घटनेमुळे संपूर्ण पिंपरी-चिंचवड परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

banner 468x60

banner 468x60

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!