जव्हार: २७ जुलै २०२३ रोजी झालेल्या महापुरात जव्हार तालुक्यातील पिंपळशेत खरोंडा पैकी माडविहरा ते हुंबरण या रस्त्यावरील दोन पूल वाहून गेले. या घटनेला जवळपास तीन वर्षांचा कालावधी लोटला, मात्र, अद्याप या पुलांचे काम सुरू झालेले नसल्याने परिसरातील नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.त्यामुळे माडविहरा-हुंबरण रस्त्यावर श्रमदानातून तात्पुरत्या पुलाची उभारणी येथील ग्रामस्थांनी केली आहे. पावसाळा तोंडावर असताना यंदाही पूल न झाल्यास परिस्थिती अधिक गंभीर होईल, अशी नाराजी स्थानिक सामाजिक कार्यकर्ते गणपत भेसकर यांनी व्यक्त केली आहे.या पुलांबाबत जव्हार सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मागणी केली असल्याचे ही भेस्कर यांनी सांगितले, दरम्यान, चौकशी केली असता निधी उपलब्ध नसल्याचे संबंधित अधिकाऱ्यांकडून सांगितले आहे. त्यामुळे यंदाही माडविहरा ते हुंबरण दरम्यान ये-जा करणाऱ्या रहिवाशांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागणार आहेत.
शाळकरी विद्यार्थी, रुग्ण, शेतकरी तसेच दैनंदिन गरजांसाठी ये-जा करणाऱ्या नागरिकांसाठी हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा असून पुलांच्या अभावामुळे पावसाळ्यात संपर्क पूर्णतः तुटण्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याने अखेर ग्रामस्थांनी पुढाकार घेतला आहे. माडविहरा ते हुंबरण दरम्यान तात्पुरत्या स्वरूपात दगड व मातीचा भराव टाकून श्रमदानातून पुलाची उभारणी करण्यास सुरुवात करण्यात आली असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. मात्र हा उपाय केवळ तात्पुरता असून कायमस्वरूपी आणि सुरक्षित पुलांची तातडीने उभारणी करण्याची मागणी ग्रामस्थांकडून जोर धरू लागली आहे.

माडविहरा-हुंबरण रस्त्यावर श्रमदानातून तात्पुरत्या पुलाची उभारणी
Recommendation for You

Post Views : 121 बेपत्ता व्यक्तींच्या प्रकरणात सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी तात्काळ एफआयआर नोंदवावा….

Post Views : 121 देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आत ८ महत्त्वाचे…

Post Views : 121 राज्य सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. सरकारने काही दिवसांपूर्वीच राज्यातील…

Post Views : 121 राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडे पुन्हा एकदा अर्थखातं सोपवलं जाणार असल्याच्या…

Post Views : 121 नीती आयोगाने मुंबई महानगर प्रदेशाच्या विकासातून सुमारे १.५ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था…












zzlWzi8qqy8Un4Ec/s320/1001506655.jpg