मुंबई : मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला आहे. यावेळी 43 नव्या मंत्र्यांनी शपथ घेतली. अनेकांना या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं काही खासदार नाराज असल्याचं समोर येत आहे. मंत्रीपद न मिळाल्यानं उदयनराजे नाराज असल्याची चर्चा आहे. त्यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी उदयनराजे यांची बाजू घेत भाजपला टोला लगावला आहे.
Home
पालघर
'छत्रपतींच्या गादीला डावलण्याचं काम करून भाजपने उदयनराजेंचा अवमान केला'; आमदार शशिकांत शिंदे
‘छत्रपतींच्या गादीला डावलण्याचं काम करून भाजपने उदयनराजेंचा अवमान केला’; आमदार शशिकांत शिंदे
उदयनराजे भोसले यांना मुदतपूर्व राजीनामा देण्यास सांगून भाजपने त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये संधी देण्याचा शब्द दिला होता. मात्र संधी न देऊन एकप्रकारे उदयनराजेंचा अवमान केला आहे. भाजपाने त्यांचा केवळ राजकीय वापर करून घेतला. त्यांचा योग्य तो सन्मान ठेवला नाही. छत्रपतींच्या गादीला डावलण्याचे काम कोण करत आहे, हे सामान्य जनतेला चांगले माहीत आहे. भारतीय जनता पक्षाने शब्द दिला होता, मात्र केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये संधी न देऊन खासदार उदयनराजे भोसले यांचा एकप्रकारे अवमानच केला आहे, असं म्हणत शशिकांत शिंदे यांनी भाजपवर टीका केली आहे.
शरद पवार यांचे उदयनराजे भोसले यांच्यावर विशेष प्रेम आहे. ते राष्ट्रवादी पक्षाचे खासदार होते. उदयनराजे भोसले हे आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असते, तर त्यांच्या शब्दाला राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये वजन असतं. मात्र भाजपने फक्त उदयनराजेंचा वापर करून घेतला, अशी टीका देखील त्यांनी केली आहे.
Recommendation for You

Post Views : 187 पालघर-योगेश चांदेकर पालघर– शिक्षणाची गंगा केवळ शहरांच्या भिंतींपुरती मर्यादित न राहता…

Post Views : 187 पालघर-योगेश चांदेकर पालघर– वसई तालुक्यातील नामांकित सेवा विवेक संस्थेने आदिवासी महिला…

Post Views : 187 पालघर-योगेश चांदेकर पालघर: ‘रॉयल-सिट्रस कंपनी’तील गुंतवणूकदार सभासद आणि प्रतिनिधींना परतावा मिळवून…

शिरगाव मांगेलआळी परिवाराचा समाजोपयोगी उपक्रम; गणेश विसर्जनासाठी विनामूल्य होडीसेवा व मनुष्यबळ उपलब्ध
Post Views : 187 पालघर : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी जपत शिरगाव मांगेलआळी परिवारातर्फे गणेशमूर्ती…

Post Views : 187 पालघर-योगेश चांदेकर आसनगावच्या सूर्यवंशी क्षत्रिय कुणबी समाज गणेशोत्सव मंडळाचा देखावा पालघर:…












zzlWzi8qqy8Un4Ec/s320/1001506655.jpg